।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.. Pench..
when search history hits the algorithm
unतूफ़ानी trek जसा "trek" होत नसतो, तसंच सर्व plans सुरळीत पार पडले असते तर blogs का लिहिले गेले असते? 😃.. scrollingच्या जगात आजही scribblingची आवड जपणारे तुम्ही वाचक आहात, म्हणून हा blog, आणि सिंहगडावर बिबट्या दिसूनही wildlife reserves आहेत म्हणून Pench सफारी 🐅..
तरी शेवटी प्रश्न एकच असतो / आहे / उरतो - "का?".. मग ते "5 Whys" RCA असो, Sinek असो किंवा पांढरा कावळा 🐦⬛.. राहुलने तो message करावा काय आणि नुसता त्यानेच नव्हे तर सगळ्यांनी त्याचा feel घ्यावा काय? 😏.. आखिर क्यूं?.. Why?..
सहसा सगळं सुटसुटीत असलेल्या plan नुसार घडत असेल तर मुद्द्याचं discuss करायला as such काही नसतं.. म्हणजे, Good Morning आणि Happy Birthday वाल्या VIP दुनियेशी संबंध नसला आणि सगळ्यांचे रहमानी 🐞 अगदी माणसागत वागत असतील तर बनवण्यात आलेल्या WhatsApp group वर राज़ चलचित्रातल्या 'यहां पे सब शांति शांति है' गाणं सोडलं तर अजून कसली कुजबुज नसते / नसायला हवी.. but then, रहमान नुसता डकैत नव्हता..
इतपर्यंत नसेल काही कळलं तर load घेऊ नका.. गोष्ट अजून सुरू झालेली नाही 😐..
so, शुरू से शुरू करते हैं..
some days ago महेशने main group वर message केला.. खूप जास्त flashback झाला का?.. गरजेचं आहे, नाहीतर हे सर्व अमूर्त मुद्दे मृतच राहतील.. so again..
some days ago महेशने "anybody interested in Pench?" असा main group वर "train travel, Good Friday आणि एक leave", असा message draft करीत sendला 📨.. कामाच्या गडबडीत किंवा messagesच्या महापुरात, कदाचित काहींचं लक्ष नसेल गेलं.. काहींना ह्याचं कुतूहल नसावं आणि राहिलेले 'निवांत reply करू' च्या नादात विसरले असावेत 🙆♂️.. काही दिवसांनी त्याला व्यक्तीक विचारलं तर कळलं, पहिला reply माझाच होता.. आधीच्या तारखा full झाल्यामुळे draft बदलून पुढचा long weekend, Apr end / Labour day असा तयार झाला.. group वर पुन्हा एकदा विचारलं तर काही जण उत्सुक दिसले.. total count final होताच, वेगळा / dedicated group बनवण्यात आला आणि MH / MP safari 🛻 book झाल्या.. houseful असल्यामुळे सिल्लारी gate तेव्हडं मुकलो.. बाकी मग / so far, all was good.. so far?.. अजून तर trailer सुद्धा चालू नाही झाला..
आता वेळ होती train bookings ची.. IRCTCची reputation बघता वेगळं सांगायला नको, की इथून पुढे local slow होणार आहे..
'बुधवारी office उरकून, गुरुवार दुपारची सफारी भेटावी' ह्या हेतूने पुण्यातून निघतांनाचे options होते गरीबरथ आणि आज़ाद हिंद.. गरीबरथ १७:३५ आणि दुसरी अजून तासाभराने असल्यामुळे नंतरच्या 🚂 झुगझुग गाडीने जाऊ, असं ठरलं.. आजकाल bookings २ महिन्यांनाधी चालू करतात, म्हणून थोडा अवधी होता.. शांती-शांती करत दिवस सरले आणि सुरू झाल्या bookings.. कुंडलिका descendचा trek already planned असल्यामुळे आम्हा दोघांना (+ वैभव) booking करणे जमणार नव्हते.. ह्या trekच्या सविस्तर माहिती साठी, please click here..
सकाळी ८च्या ठोक्याला महेशने booking करायला घेतले.. as usual, काही केल्या ticket book होईना 🎫 आणि groupची शांती काही वेळापुरती विस्कळीत झाली.. ताम्हिणी घाटातून आम्ही दोघं नको ते वायफळ प्रयत्न करत होतो.. काही वेळाने संतोषच्या कष्टांना यश आले.. जायची सोय होताच होती ती शांती पूर्ववत झाली..
परतीच्या bookingची खिडकी अजून काही सूर्योदय बंद असणार होती.. ती उघडताक्षणी तळजाई walk नेहमीपेक्षा झटपट आवरत तासकाटा ८चा आकडा ओलांडत नाही 🕗 तर तिथल्या parking मध्येच कोडं सोडवायला घेतलं जे अर्धा तास प्रयत्न करून सुद्धा सुटलं नाही.. नाद सोडत, घरी परतल्यावर पुन्हा एकदा जोमानं केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले खरे, पण number मात्र प्रतीक्षा यादीत (WL) लागला.. अरे हो, एक सांगायचं तर राहीलच.. on paper schedule प्रमाणे येतांना झुगझूग गाड्या मागे-पुढे आहेत.. म्हणजे, गरीबरथ नंतर पोहोचत असल्यामुळे सोमवारचं office वेळेत चालू करता यावं, ह्यासाठी त्याच आज़ाद हिंदने येण्याचं ठरलं होतं .. इतर trains पेक्षा हिचं एक दिवस आधी booking चालू व्हायचा खास फायदा झाला नव्हता, कारण लांबून येत असल्यामुळे आम्हाला हव्या त्या seatsचा quota मोजकाच..
नंतर tubelight 💡 पेटली अशी की ह्या बाईसाहेब वेळेवर तयारही होत नाहीत आणि वेळेवर कधी पोहोचतही नाहीत.. बोंबला.. track record बघता half day टाकायची वेळ येणार होती.. WL clear होतील, ह्याची खात्री होती कारण आकडे मोठे नव्हते, पण half day टाकायची कोणाची मंजुरी नव्हती, specially when there are better options available.. की म्हणावं, there are 'other' options available..
दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच पडझड.. पण ह्यावेळेस कोडं अतिशय सोपं.. गरीबरथ congested असली तरी नुसतं other नसून 'better' option म्हणायला हरकत नसावी इथे.. आणि आज़ाद हिंद book झाल्यापेक्षा cancel केल्याचा आनंद जास्त होता.. reality check - सोमवारी, ह्या बाईसाहेब पुण्याला पोहोचल्या तेव्हा दुपारचे 04:40 (a depressing smiley) वाजले होते ☹️.. that explains, घड्याळाच्या दुकानातल्या घड्याळात नेहमी 10:10 (a happy smiley) का वाजले असतात 😊..
checklist मधला शेवटचा item होता camera 📸.. ज्यांच्याकडे आहे, त्यांनी घ्यायचं ठरलं - ये भी कोई बताने वाली बात है 😁.. all set to take off then.. आता राहीलं होतं नुसतं जायचं आणि यायचं - only if.. इतकं सोपं असतं तर हा blog का लिहिला असता?..
तर ह्यो व्हता trailer.. की म्हणावी प्रस्तावना?.. what follows is, 1. how it should not have been and 2. couldn't have been better - both at the same time 😜..
not just a jungle.
but a living storybook.
काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा 'work from Nashik' झालं होतं.. २०२० मध्ये जसे नाशिक sideचे treks आटोपले, ह्यावेळेस ती संधी doodlesनी साधली.. जमलं तर ह्यासाठी वेगळा लेख कधीतरी सापडेल तुमच्या inbox मध्ये.. so, नाशिकला असल्यामुळे पुणे boarding 🚉 तसंही हुकणार होतं.. nearest option मनमाड हून इतरांना join व्हायचा plan b ठरला खरा, पण मग TTE आजकाल बरेच strict झाले आहेत.. ५ जण पुण्याहून जरी बसणार असले तरी माझी seat दुसऱ्याला द्यायला त्याने अजिबात second opinion घेतलं नसतं.. म्हणून स्वप्नील करवी ती सुद्धा सोय करून ठेवली होती..
सोमवारी सकाळी mobileची झोप मोड केली तर लक्षात आलं की त्याने temperatureचं 🌡️ tension घेत internet बंद पाडलंय.. असेल काही temporary glitch म्हणून थोडा वेळ वाट बघितली.. अजूनही रुसून बसल्याचं लक्षात येताच online check करून बघितलं तर ठळक अक्षरात "services suspended" वाचायला मिळालं 😳.. corporate sim असल्यामुळे मी असीमला सांगण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो.. आणि corporate sim असल्यामुळेच problem तातडीने solve होईल, ही अपेक्षाही होती..
२९ एप्रिल - ०४ मे २०२६
बुधवार दुपार / संध्याकाळ ते सोमवार सकाळ
शांती सहन नाही झाली groupची, म्हणून आमच्या पांढऱ्या कावळ्याने चोच मारली - "कोणी cancel नाही झालं, कोणी काही update करत नाही, tripचा feel नाही आला अजून" असा त्याचा message.. आता ह्याला काय सांगावं, सोमवार पासून Trumpने इथल्या internet सोबत outgoingही अडवून ठेवलंय.. on top of this..
सुरवातीपासून इथपर्यंतचा लेख नाशिक - नागपूर bus 🚌 मध्ये बसल्यापासून पुण्याची installment नागपूरला पोहोचेपर्यंत लिहिला गेला आहे.. काहीतरी चुकल्यागत वाटलं? - train book करून busने नागपूर प्रवास? 🤨 🧐.. तर मित्रांनो, ही जाणून केलेली चूक होती, ज्याला आता plan c म्हणायचं.. कारण राहुलचं manifestation 🏁 finish line पलीकडून मिश्किलपणे आमच्यावर हसत होतं 🙂↔️.. जे "feel पाहिजे" म्हणाला होता - IRCTC ने ते वाजवी हट्ट पुरवले होते.. ते म्हणतात ना - भगवान के घर देर है, अंधेर नही - तसलंच काहीतरी..
कामात थोडा break घेऊन WhatsApp बघितलं तर group शेजारी unread messagesचा '५२' आकडा बघून काहीतरी बिनसल्याचं लक्षात आलं 😳.. पहिला msg 'forwarded' म्हणून tagged होता.. crux was, 'train was delayed by 4 hrs' 🤦♂️.. so, तिथून पुढे ४ तासांनी चालू होणाऱ्या झुगझुग साठी आता ८ तास वाट बघावी लागणार होती, आणि उद्या दुपारची सफारी अगदी अटीतटीवर cancel होऊ बघत होती.. त्यात अजून delay होणार नाही, ह्याची guarantee घेणारं कोणी नव्हतं.. also / दुसरं म्हणजे / indicatively, मला मनमाडला जाऊन किती वेळ वाट बघावी लागेल, आता ह्याचंही काही मोजमाप राहिलं नव्हतं 😒..
irrationality personified 🤔.. आज़ाद हिंद regularly delay होते तर तिचे schedule permanently का बदलत नाही?.. किंवा हा route बंद का करत नाही?.. logistics fail होत आहेत तर जोवर परिस्थिती सुधरत नाही, तोपर्यंत नसेल route बंद करायचा तर suspend तरी करा.. नाहीच काही जमत तर कमीतकमी नाव तरी बदला - उगाच कशाला म्हणावं ना "आज़ाद हिंद".. आणि हे फक्त ह्या बाईसाहेबांच्या बाबतीत नाही हं..
irrational वाटतं आपल्याला, कारण our countrymen are full of opinions (including me).. युद्धपातळी वर काय घडत आहे, हे फक्त लढणाऱ्यांना माहिती असतं, नाही का ⁉️.. असो..
सर्व options discuss झाल्यावर थेट नागपूरला ९ दरम्यान भेटायचं ठरलं.. निघायच्या ऐनवेळी देव पावला 🙏 आणि jio वाल्यांनी मेहरबानी करत services restore केल्या.. जत्रा hotelला bus stop शोधायला थोडा गोंधळ झाला, पण नागपूर पर्यंत train काय आणि bus काय, net-net एकच पडलं (होणारा खर्च आणि लागणारा वेळ as per plan a) 😇 - कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - फक्त झोप थोडी compromise करावी लागली, तेव्हडा त्रास झाल्याचा फरक.. reality check - मी नागपूरला उतरलो तेव्हा आज़ाद हिंद मनमाडला होती आणि नागपूरला पोहोचली तेव्हा आम्हाला already 🐅 sighting झाली होती..
The Jungle Book.. by Rudyard Kipling
एखाद वर्षाचा मुलगा मध्य भारतातील सिवनीच्या जंगलात हरवतो.. तो एका मादी लांडग्याला सापडतो 🐺.. आणि पुढे काय होतं, हे वेगळं सांगायला नको.. हे सिवनीचं जंगल म्हणजे Pench.. not just a jungle, but a living storybook 📖.. अर्थात, आम्ही Kiplingने इथे आखलेल्या त्या कल्पनेची सैर करणार होतो.. मोगली ने काय जे जगलं, ते आम्ही चिमूटभर का होईना अनुभवणार होतो..
the feel.. Pench
photo credits: महेश, वैभव, अमरजीत
नागपूर ते जबलपूर majority area हा सिवनी जिल्ह्यात मोडतो.. जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिमेकडे असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला इथल्या नदीचं नाव दिलं आहे - पेंच.. सहसा अश्या प्रकल्पांमध्ये sighting साठी / तिथले वन्यप्राणी बघायला सफारीची सोय असते.. फिरायला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यातून स्वतंत्र gates आहेत ⛩️.. प्रत्येक gateला त्याचा area / zone विभागून दिलेला आहे.. zone २ प्रकारचे आहेत / असतात - core आणि buffer.. core पूर्णपणे नैसर्गिक असतो - वस्ती नसते, इथले resources कोणी, किंवा आसपासच्या गाववाले कुठल्या purposes साठी कापू / वापरू शकत नाही etc... सफारी मात्र दोन्ही zones मध्ये होतात 🚙.. प्रत्येक zoneचा area ठरलेला असतो.. sighting शक्यतो जलाशयाजवळ होते.. दुसरी शक्यता असते शिकार केल्याच्या ठिकाणी, जी again, mostly जलाशयाजवळ असते.. एकदा शिकार झाल्यावर ती संपेपर्यंत शिकारी प्राणी तिथून हलत नसतात.. sightingची तिसरी शक्यता असते callingच्या वेळेस 📣.. बरं, calling म्हणजे एखादा हिंस्र प्राणी जंगलातल्या इतर शाकाहारी किंवा लहान प्राण्यांना दिसला की ते इतरांना (जसे की हरिण, सांबर, माकड) धोक्याची सूचना देण्यासाठी विशिष्ट आवाज काढतात.. चौथी शक्यता - काल दिसला तिथे आज किंवा सकाळी दिसला तिथे संध्याकाळी 😆..
with that prologue, let's explore Mowgli's den, चिमूटभर..
सफारी १ - खुर्सापार (संध्याकाळ)
बारसच्या २ लेकी, b1 आणि b2.. b2 ला २+२, असे ४ अपत्य.. खुर्सापार zone मध्ये ह्या पैकी b2 आणि तिची मोठी लेक असते / दिसते / दिसले 👍.. तत्पूर्वी / halftime पर्यंत आम्ही वाघाची sighting नाही होणार ह्या हिशोबाने विविध पक्षी आणि प्राणी बघायचा आनंद घेत होतो.. हरिण, लंगूर, दुरवर सांबर आणि भरपूर पक्षी.. तळजाई पेक्षा इथे जरा मोठे आणि अजूनही शिल्लक असणाऱ्या पिसांसोबत मोर बघायला मिळाले..
काही दिवसागोदर शिकार झाल्याचं माहिती होतं म्हणून second innings मध्ये guideने gypsy उसरीपार तलावाकडे वळवली.. बऱ्याच वेळानी 'सब्र के फल' की मिठास द्यायला b2 अंगडाई देत उठली (२००+ मी.).. पैसे वसूल झाले होते, तरी सोने पे सुहागा होती तिची लेक, जी डावीकडून तिच्या रुबाबदार style मध्ये आमच्या दिशेने येत होती (२५०+ मी.).. magical moments of the trip.. or, 'so far'?
सफारी २ - टुरिया (सकाळ)
gypsy वाल्यांचा थोडा गोंधळ झाल्याचा फायदा आम्हाला असा झाला की अगदी जवळून KP ने cross केले.. तत्पूर्वी, भरपूर असणाऱ्या ह्या zone मध्ये आम्हाला मुबलक हरिणांनी 🦌 दर्शन दिले.. ऋतूनुसार रंग बदलणारे, सध्या पांढरे ghost tree सुद्धा इथे दिसले.. इतर रंग - हिरवा (पावसाळा) आणि गुलाबी (हिवाळा).. ह्या भागात पेंच नदी सुद्धा आहे म्हणून हरियाली आणि visibilityही जास्त.. नदीपर्यंत जाता-येता बरेच मोर दिसले 🦚.. सुरवातीला पिसारा फुलवलेल्याला cameraत कैद केलं.. तिथून पुढे जात नाही तर उजवीकडून डावीकडे "काला पहाड़" शेरनी cross झाली (१०-१२ मी.).. सफारी चालू झाल्या-झाल्याच आजचं target पूर्ण झालं होतं, जे ह्या संपूर्ण tripचं highlight सुद्धा होतं 😎..
सफारी / gypsy एकमेकांना cross होतांना guide / मार्गदर्शक त्यांच्या आदिवासी गोंडी भाषेत sighting / no sighting बद्दल एकमेकांना जे सांगत असतात, त्यात एका male adult बद्दल कळलं.. आळशी म्हणावं का मनमौजी - ढेपाळल्यागत आडवा होऊन भाई हलायलाच तयार नाही (~२०० मी.).. मोजून २ सेकंद तो उठला काय, आणि त्याची size बघून आम्ही चाट पडावं काय !?.. मज़ा आ गया 👌..
पुढे 'cherry on the cake' momentच्या स्वरूपात आम्हाला जोडीने कोल्हे / jackal दिसले 🦊..
सफारी ३ - रुखड़ (संध्याकाळ)
ही सफारी highway के उस पार वाली होती.. पूर्वेकडील MPच्या दोनमेव zones मधील एक, दुसरा मसुरनाला.. आणि आमच्या plan मधला एकमेव buffer zone.. म्हणून sightingची अपेक्षा न ठेवता आम्ही फक्त जंगल बघायला निघालो होतो.. terrain बऱ्यापैकी uneven.. त्यात झाडं इतके की visibility काहीच नाही.. कालच्या आणि सकाळच्या too good luckला compensate करत आज नंदरुक जलाशय सोडून आम्ही पुढे आलो, तेव्हा rocky 🐆 तिथून गेल्याचं कळलं.. guide नुसार, 'यहां की females roadshow नहीं करती', पण rocky (बिबट) दिसला एकाला तर सगळ्यांना दिसतो, असंही कळलं.. आजचा दिस - was an exception..
अगदीच निराश होऊन gate बाहेर निघण्यापेक्षा गवे 🦬 आणि hornbill पक्ष्यांचे भरपूर sighting झाले.. निघतांना सांबरने call दिल्याचा आवाज येताच तातडीने त्या दिशेने फिरलो खरं, पण नुसतं त्याच्याच sighting वर समाधान मानावं लागलं..
सफारी ४ - खुर्सापार (सकाळ)
परवा पेक्षा आज सगळच ओसाड होतं.. बोटांवर मोजण्याइतके प्राणी दिसल्यामुळे थोडी नाराज़गी होती 😞.. परवा बिंदू नव्हती दिसली, आज तिचे sightingचे प्रयत्न चालू होते.. कालच्या तिच्या locationच्या आसपास थोडा वेळ वाट बघितली - no luck.. 'ही नाही तर b2 पुन्हा दिसते का?', म्हणून उसरीपार तलावाजवळ जाऊन वाट बघितली - no luck 😔.. काल संध्याकाळची पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली - halftime पर्यंत सगळ्यांचे चेहरे पडले होते.. कालच्या नाल्याजवळ पुन्हा जात, तिची काही हालचाल नसल्याचं लक्षात घेत, (कोणाला सांगू नका बरं 🤫) आमचे guide मित्र थोडं अवैध काम करत आम्हाला तिने दर्शन नाही दिले म्हणून काय झालं, तिचे दर्शन घ्यायला घेऊन गेले (~५० मी.).. परतल्यावर driverने गाडी मागे पुढे करत गुन्हा केल्याचे पुरावे / tyre marks ही गुडूप केले.. सांगू नका कोणाला - तेरी भी चुप, मेरी भी चुप 🤐..
परततांना अजून पर्यंत स्पष्ट आणि जवळून न दिसलेले सांबर आज बरेच मेहरबान होते..
सफारी ५ - टुरिया (संध्याकाळ)
दुसरीचं revision म्हणून ही full-n-final.. परीक्षेला बसलो तर syllabus बाहेरचा प्रश्न आला, पाऊस.. काल दुपारी निघायच्या आधी जो धो-धो झाल्यामुळे सफारी cancel होते का काय, वाटत होतं, ती सफारी अगदी व्यवस्थित झाली आणि आज दुपारी निघतांना जे भाजून निघालो ☀️ त्याची ही तासाभरात कायापालट 🌦️.. ये-जा करत त्याने सगळी मजा घालवली.. असो.. २ ऐवजी १, वाघ आणि कोल्हा cameraत सोबत घेऊन आम्ही ह्या प्रकल्पाचा निरोप घेतला.. वाघ. तोच. मनमौजी, जागा सुद्धा तीच (~२०० मी.).. 'अपनी मर्ज़ी का मालक' का जीता जागता और सटीक उदाहरण.. वैतागून विचार आला, 'दगड फेकून मारावा का?', म्हणजे काही हालचाल तरी नज़रबंद नज़रेत बंद करता येईल - just joking 🤠 - असले stunt कधी चुकून सुद्धा करू नका बरं - तुमच्या ऐवजी तोच चांगला feel घेईल मग..
कर्माझीरी gateच्या सफारी सुद्धा इथे येतात, म्हणून ह्याला बघायला बरीच demand होती, पण त्यो नुसता माशी उठवायला जितके हातवारे करावे लागतील, तितकीच हालचाल करीत होता ..
that should be article's full stop then.. इतनी आसानी से नही, क्योंकि picture अभी बाकी है मेरे दोस्त.. well, this time literally.. नागपूरच्या उन्हात ६ पर्यंत काय करायचं?.. only personified rational option was - resort हुन लवकर निघुन movie 🎥 बघायला जाणे.. and that concludes first of its kind - the feel - व्याघ्र प्रकल्पातील एक अविस्मरणीय wildlife सफारी.. #CannotAskForMore













Awesome experience 👍 I missed it 😔
ReplyDeleteइत्थंभूत वार्तांकन 👍 मस्त .. मजा आली वाचायला 👏
ReplyDeleteपरत एकदा एक भन्नाट ट्रिप आणि वर्णन....☺️👌👌
ReplyDelete