।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
उद्या भारत 🇮🇳 जिंकेल का 🏏?.. home ground.. what are the odds?
मागच्या वर्षी ODI WCWC जिंकलो, त्याबद्दल लिहायचं राहिलं.. म्हणून, आधी backlog भरून काढुया (अगदी थोडक्यात).. २०२३ सालचा जखमी शेर Australia 🇦🇺, आणि २०२५ चा जखमी भारत, ह्यात पुरुष आणि महिला संघ सोडले, तर खास तसा फरक नव्हता..
group stage मधून चौथ्या स्थानावर उपांत्य फेरीसाठी qualify होणं आणि त्यातून विश्वचषक जिंकून आणणं म्हणजे नुसतं कौतुकास्पद नव्हे तर कारगिल गर्ल 🚁 चलचित्रातल्या कौसर मुनीरच्या "है सारे जहाँ पे भारी, मेरे भारत की बेटी" मधल्या एकुणएक शब्दाला शोभण्यासारखं होतं.. as Siddhu also quotes (courtesy: TGIKS, Netflix),
मिथाली राज से लेकर
स्मृती और हरमनप्रीत तक भारत का असली नाज़ है औरत..
ये सीने में तूफान और रगों में बलिदान है,
ये जेमिमाह का जुनून है
और दीप्ति शर्मा के हुनर की पहचान है..
ये शबरी का इंतज़ार भी है,
और रानी लक्ष्मीबाई की जयजयकार भी है..
ये ज़िद है भीकाजी कामा की,
और ये शेफाली वर्मा की विजय ललकार भी है..
ये हमारा गहना है, ये हमारी सच्ची दौलत है..
ये आजके gentlemen's cricket game के सर की ताज है..
जब भी भारतीय cricket का इतिहास लिखा जाएगा,
हरियाणा hurricane कपिल देव, captian cool MS Dhoni और पंजाब की power girl हरमनप्रीत का नाम आएगा..
back to 2026,
२०११ साली भारताने जी प्रथा मोडली, त्याची यंदा पुनरावृत्ती होईल का?.. जसा दहावा ODI MCWC 🇮🇳 भारताने भारतात जिंकला, तसाच हा दहावा T20I MCWC भारत भारतात जिंकेल का?.. आधीच्या ९ पैकी कुठलाच चषक 🏆 यजमान देशाने जिंकला नव्हता (ODI) / अद्याप जिंकलेला नाही (T20I).. धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकाराने 'यजमान देश जिंकत नाही' हा समज मोडीत काढला होता.. असंच काहीतरी सुर्या करेल का?..
ह्यात तर्क शोधण्यापेक्षा परंपरेला मोडण्याची जिद्द महत्त्वाची होय 😊.. कारण सरतेशेवटी 'उम्मीद पे दुनिया कायम है'.. तसंही भीती आणि आशा दोन्हीही दिसत नाही - त्यामुळे कशावर जास्त विश्वास ठेवायचा, हे फक्त आपल्यावर असतं..
कुठेतरी बघितलं / ऐकलं असेलच की २००७ साली ZIM 🇿🇼 ने AUS ला हरवलं होतं.. भारत super 8 मधला पहिला सामना हारला होता.. ह्यावर्षीही same pattern repeat होत असतांना दिसत आहे.. आज इतिहासाची ही चक्रे ☸️ पुन्हा त्याच जागी येऊन थांबली आहेत, जिथून T20I विश्वचषक आणि भारताच्या विश्वविजेतेपदाचा प्रवास सोबत सुरू झाला होता 🏅.. योगायोग म्हणायचे की नियती?.. शेवटी 'history repeats itself' नावाचाही काही प्रकार असतोच की..
अपनी गली में कुत्ता भी शेर होता है.. home ground
खेळपट्टी आणि प्रेक्षकांचा आवाज हे एखाद्या ब्रह्मास्त्रासारखं नक्कीच काम करतात.. पण जेव्हा परके संघ दुसऱ्यांच्या अंगणात जाऊन डरकाळी फोडतात, तेव्हा home groundचा दबाव आपल्यावरच उलटतो का? 🙄..
a bit off-track.. trekला गेलो असता, बहुतेक वेळेस एखादा कुत्रा 🐕 असतो सोबत.. एकटे असाल वाटेवर, तर ह्याची शक्यता जास्त.. such noble souls - शोधून सापडणार नाहीत.. मग हे जेव्हा trek करत-करत (सोबत चालत-चालत) दुसऱ्यांच्या territoryत शिरतात, तेव्हा सुरू होतो कल्लोळ.. नेमकी हीच परिस्थिती एखाद्या 'away series' मध्ये असते.. तुम्ही कितीही ताकदवान असा, पण समोरच्याचा गड सर करताना स्थानिक 'शेरां'चा सामना करावाच लागतो.. आपल्या सोबत आलेला बिचारा कसातरी त्या शेरांपासून धडपड करत जीव वाचवत असतो.. सर्वच बाबतीत हे बहुदा बघायला भेटतं..
२०१३ ची champions league आठवते तुम्हाला?.. तुम्ही म्हणाल cricketच्या article मध्ये football ⚽ कुठून आला !!.. not really.. cricketची champions league - असं पण काही असतं का?.. हो, २०१४ पासून काही कारणाने बंद झाली, पण त्याआधी व्हायची.. परत चालू करत आहेत, असं ऐकलंय, we'll see.. back to २०१३.. Rajasthan Royalsने सर्व सामने जिंकले, फक्त अंतिम फेरी हारायला.. का?.. तर म्हणे, सामना Jaipurला नव्हता..
२०१५ ODI MCWC तर नक्कीच आठवत असेल.. exact same pattern आपण बघितला NZ 🇳🇿 सोबत.. सर्व सामने मायदेशी खेळून जिंकले आणि final Melbourneला जाऊन हारले 😵.. थोडक्यात काय?, तर परिस्थिती बदलली की नशिबाचे फासेही उलटे पडतात.. put differently, आपल्या बालेकिल्ल्याच्या बाहेर पाऊल टाकताच मोठमोठ्यांचे 'किल्ले' ढासळतात..
पण मग, अशी काही परिस्थिती ह्या finalची तर नाही 🤔.. सामना तर भारतातच आहे.. एक भारतीय म्हणून तुमच्या आशा वाढल्या असतील तर चला थोडी भीती सुद्धा घालतो..
तर आठवा - eighth नाही remember.. तर आठवा तो दिवस आणि ती रात्र.. आठवा Cummins काय म्हणाला होता - nothing more satisfying than hearing a big crowd go silent 😶.. २०२३ च्या चषकात भारत एकुलता सामना जो हारला तो ह्याच मैदानावर 🏟️.. आणि नुकताच SA विरुद्ध जो एकुलता सामना ह्या चषकातला हारला, तो सुद्धा इथेच.. जखमी शेर आणि गली का कुत्ता सारखे हे दोन्ही संघ जे बरसले, त्याचं भारताकडे काही उत्तर नव्हतं.. आता तुम्ही म्हणाल, जखमी शेर ठीक आहे, पण SA 🇿🇦 आणि गली का कुत्ता काय गणित आहे?.. थोडक्यात, आठवा - remember नाही eighth 🎱.. आठवा सामना कोलकात्याला हारण्या आधी, ते इथे ५ सामने खेळले होते, so गली का कुत्ता..
मैदानाचं नाव बदलल्या पासून, हे दोन्ही सोडून इतर कुठले सामने भले भारताने इथे हारले नसतील (एक कसोटी सामना अनिर्णित होता), पण २०२३ चा गमावला, त्याने सब किये पे पानी फेर दिया 😭.. after all, "all that glitters is only gold".. इससे और भी कुछ याद आया.. यंदा परत (२०२४ सारखंच), Ind एकदा all out झाली आहे, NZ अजून नाही.. more details on both these topics in earlier ODI and T20I MCWC articles.. शेवटी links दिल्या आहेत..
त्यात रोहित शर्मा म्हणतोय, repeat तर करूच, सोबत history defeat सुद्धा करू.. तिसऱ्यांदा, लागोपाठ आणि यजमान - तीन प्रकारे never before achievements in T20I MCWC.. रोहितच्या 'hitman' जिद्दीसमोर इतिहासही नतमस्तक होईल अशी आशा आहे.. एका तऱ्हेने त्या दिशेने वाटचाल चालू दिसते तर आहे.. २०१२ चा 🇱🇰 SL सोडला तर इतर कुठलाच संघ, अजून अंतिम फेरी जिंकणे सोडा, अंतिम फेरीत पोहोचला सुद्धा नाही आहे.. घरच्या मैदानावर अंतिम फेरी गाठणारा भारत हा केवळ दुसराच संघ ठरला आहे.. defeat करायला हे सुद्धा एक आव्हान होतंच, ज्यात भारताला यश आलं आहे..
अजून एक महत्वाचं सांगायचं झालं तर.. भारताचा सर्वाधिक धावांनी T20I सामना जिंकायचा विक्रम, ह्याच मैदानावर आहे.. समोर कुठला संघ होता?, ह्याचा कदाचित तुम्ही अंदाज लावला असावा.. तब्बल १६८ धावांचा फरक.. खूप जुनी गोष्ट नाही आणि NZचा संघही २-३ जणांच्या फरकाने साधारण तोच - १ फेब्रुवारी २०२३.. अब तो खुश हो जाओ 😃..
तरी, "कोण जिंकेल?" ह्याचं उत्तर इथे काहीजरी आणि कितीजरी लिहिलं तरी सामना झाल्याशिवाय मिळणार नाही आहे.. आपल्याला भीती आणि आशा जरी दिसत नसल्या तरी रोहित म्हणतो तसा, मैदानावर उतरल्यावर आपल्या खेळाडूंना दिसतो तो फक्त तिरंगा 🇮🇳.. सर्वाधिक अनिश्चितता असलेल्या ह्या खेळात 🏏, जिथे कागदावरचे आकडे मैदानावरील गाळलेल्या घामाने पुसले जातात, एवढं तर नक्की आहे - उपांत्य फेरी एवढी चुरशीची झाल्यामुळे अंतिम फेरी 'पानी कम चाय' होणार आहे.. अभिषेक आणि वरुण नक्की चालतील (खेळवलं तर) २०२४ च्या कोहली सारखं.. तसंच रवींद्रची फळी सुद्धा..
home ground चा फायदा कुठल्या संघाला मिळेल, सांगणं अवघड आहे, कारण दोन्ही संघ SA विरुद्ध हारले होते, ज्यात भारताची कामगिरी NZ पेक्षा जरा अधिकच गरीब होती.. म्हणून, home ground ब्रह्मास्त्र म्हणून काम करेल की दडपण, सांगणं सद्यपरिस्थितीत अवघड आहे..
पण जर भारत इथे पुन्हा हारला, तर मात्र ह्या मैदानाचं नाव पुन्हा 🗿 Ironman ठेवण्यात यावं, ही सदिच्छा.. कारण इथे अंतिम सामन्यापर्यंत टिकण्यासाठी आणि अंतिम सामन्यात जिंकण्यासाठी पोलादी जिद्दच हवी..
annexure
ODI MCWC 2023,
T20I MCWC 2024,

हे आर्टिकल न्यूझीलंड टीम ला वाचायला द्यायला पाहिजे, एवढे references शोधण्यात ८ दिवस जातील त्यांचे 😜
ReplyDelete😂😂
Delete