।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। शारदीय नवरात्र म्हणून तुम्हाला कदाचित "नवसकाळी" article अपेक्षित असावं.. येईल तेही काही दिवसात.. पण आजचा color 'pink' म्हणून अधोलिखित.. तसंही बरेच दिवस, महिने, कदाचित वर्ष झालं असेल, ह्या विषयावर लिहायचं होतं.. मुलगी शिकली, प्रगती झाली .. तुम्हाला काय वाटतं? (not to be confused with and not to be misinterpreted as 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ') बऱ्याच लोकांचा जिवाभावाचा विषय.. असून नसल्यासारखा.. नसून असल्यासारखा.. ह्या विषयाशी निगडित अस्तित्वात असलेलं, नसलेलं सगळं मान्य आहे, फक्त एक नजर पडद्याआड टाकूया आणि विषय समजण्यासाठी जरा खोलात जाऊया, or, from a different perspective.. feminism सध्या खूप गाजलंय.. आणि हा गाजावाजा थांबेल किंवा संपेल, असं काहीही दिसत नाही.. coronaचाही असाच भास झाला होता.. पण मग कसं ! तो जागतिक विषय होता ना.. किती दिवस सहन करणार? कुठून तरी, कोणी तरी त्याच्यावर उपाय शोधणार, हे नक्की होतच.. feminismचं तसं नाही आहे - अगदी रामायण, महाभारतच्या काळापासून हा विषय अस्तित्वात आहे.. गेल्या काही वर्षात फक्त ह्याचं बारसं झालंय, rat...