Sunday, 10 May 2026

Doodles 3

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे.. Doodles 3

काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा 'work from Nashik' झालं होतं.. २०२० मध्ये जसे नाशिक sideचे treks आटोपले, ह्यावेळेस ती संधी doodlesनी साधली.. जमलं तर ह्यासाठी वेगळा लेख कधीतरी सापडेल तुमच्या inbox मध्ये.. Pench article मध्ये कबूल केलं म्हणून निम्नलिखीत.. अगदी थोडक्यात..

Challenges force us to search for a new center of gravity..

Krissh movieचा sequel जसा Krissh 3 🎭 होता, तसंच doodles नंतर हा doodles 3 लेख.. कारण असं की ह्यात अलीकडे बनवलेले doodles आहेत, all of them on youth festival ground 🏟️.. पहिल्या article नंतरचे आणि ह्या article मधल्यांच्या आधीच्यांच्या साठी, doodles 2 sequel-cum-prequel article पुढील काही दिवसात 😝..

विशेष काय?.. तर सर्व free hand आहेत, rather "free leg".. कुठेही teleporting नाही, आणि main म्हणजे, अनपेक्षितपणे सुरेख बनलेल्या आकृत्या.. 🥳 तरी, वाचून लक्षात येईलच, पहिल्या article प्रमाणे शब्द माझे नाहीत.. तरी..


the melody queen left a void.. आशा ताईंचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे, तर भावनांचा एक अथांग सागर होता / आहे / नेहमीच राहील.. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, हे पाऊल-चिन्ह, त्यांच्या अजरामर गाण्यांना वाहिलेली आमच्या style मधली श्रद्धांजली 💐..


मैदानाच्या विस्तीर्ण पटलावर जेव्हा आपल्या देशाचा नकाशा 🇮🇳 काढला, तेव्हा मनात एक वेगळाच अभिमान दाटून आला.. surprisingly random. 
unpredictably clean. short and proud.. केवळ एक रेखाटन नसून, आपल्या विविधतेतील एकतेचे आणि अथांग सीमांचे प्रतीक..


दृष्टीभ्रम निर्माण करणारा हा चौकोन म्हणजे जीवनातील गुंतागुंतीचे दर्शन.. पाहताना जे अशक्य वाटते, ते कल्पकतेने आणि जिद्दीने प्रत्यक्षात उतरवता येते, हीच ह्या doodleची शिकवण.. impossible square 


तंत्रज्ञानाच्या युगातील एक छोटेसे पण क्रांती घडवणारे साधन.. या आयताकृती आकारातून आपण अगदी सहजरित्या एकमेकांशी आज संवाद साधतो.. आणि ह्यामुळेच आमच्यासारखे आज दीवार मधला dialogue perform करू शकतात, आज मेरे पास गाडी है, बंगला घर है अगैरे वगैरे.. 😀


निळ्या नभास स्पर्धा करणारा पतंग आणि त्याला सावरणारी ती नाजूक कन्नी.. 🪁 मुक्त भरारी घेण्याची ओढ आणि at the same time, आपल्या मुळांशी घट्ट जोडले राहण्याचे एक सुंदर समीकरण..


आपल्या संस्कृतीतील पारंपरिक खेळांची आठवण करून देणारा हा 'चल्लस'.. साध्या रेषांमधून जुन्या आठवणींना उजाळा देत, या पटावरील, rather पाटा मागचा वारशाचे digital स्वरूप..


अनेक पिढ्यांचे मनोरंजन करणारा हा साध्या चौकटींचा दुसरा खेळ..


आईच्या साठीनिमित्त 🎂 ह्या तिला एक आगळ्या प्रकारे दिलेल्या शुभेच्छा हार्दिक..


कामाच्या गडबडीत ऊर्जेचा स्रोत - a cup of tea ☕.. त्यात office मधला असला तर कधी-कधी सोबतीला असते अशी ठुमकणारी आणि लटकणारी ती चहाची पिशवी / tea-bag..


विश्वाचा आदिम ध्वनी आणि मनाला शांती देणारे प्रतीक - ॐ.. एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देण्याचा हा एक छोटुसा प्रयत्न.. 🕉️


भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाणारे प्रतीक.. चारही दिशांनी येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे ⚡ आणि मांगल्याचे दर्शन..


and the best of all needs no caption..


the last one, back to आशा ताई.. गाणं सुद्धा शब्दांच्या थोड्याफार हेरा-फेरीने तेच.. काळाचे मोल सांगणारे हे एक प्राचीन साधन.. जो बीत रहा है ⏳ - वह समय नहीं, जीवन है.


अजून मग, भेटू लवकरच sequel-cum-prequel मध्ये.. तब तक..

Just move.
One breath. One step. One beat.

annexure

article on Doodle

article on Pench

Thursday, 7 May 2026

Pench

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.. Pench..
when search history hits the algorithm

unतूफ़ानी trek जसा "trek" होत नसतो, तसंच सर्व plans सुरळीत पार पडले असते तर blogs का लिहिले गेले असते? 😃.. scrollingच्या जगात आजही scribblingची आवड जपणारे तुम्ही वाचक आहात, म्हणून हा blog, आणि सिंहगडावर बिबट्या दिसूनही wildlife reserves आहेत म्हणून Pench सफारी 🐅..

तरी शेवटी प्रश्न एकच असतो / आहे / उरतो - "का?".. मग ते "5 Whys" RCA असो, Sinek असो किंवा पांढरा कावळा 🐦‍⬛.. राहुलने तो message करावा काय आणि नुसता त्यानेच नव्हे तर सगळ्यांनी त्याचा feel घ्यावा काय? 😏.. आखिर क्यूं?.. Why?..

सहसा सगळं सुटसुटीत असलेल्या plan नुसार घडत असेल तर मुद्द्याचं discuss करायला as such काही नसतं.. म्हणजे, Good Morning आणि Happy Birthday वाल्या VIP दुनियेशी संबंध नसला आणि सगळ्यांचे रहमानी 🐞 अगदी माणसागत वागत असतील तर बनवण्यात आलेल्या WhatsApp group वर राज़ चलचित्रातल्या 'यहां पे सब शांति शांति है' गाणं सोडलं तर अजून कसली कुजबुज नसते / नसायला हवी.. but then, रहमान नुसता डकैत नव्हता..

इतपर्यंत नसेल काही कळलं तर load घेऊ नका.. गोष्ट अजून सुरू झालेली नाही 😐..
 

so, शुरू से शुरू करते हैं..

some days ago महेशने main group वर message केला.. खूप जास्त flashback झाला का?.. गरजेचं आहे, नाहीतर हे सर्व अमूर्त मुद्दे मृतच राहतील.. so again..

some days ago महेशने "anybody interested in Pench?" असा main group वर "train travel, Good Friday आणि एक leave", असा message draft करीत sendला 📨.. कामाच्या गडबडीत किंवा messagesच्या महापुरात, कदाचित काहींचं लक्ष नसेल गेलं.. काहींना ह्याचं कुतूहल नसावं आणि राहिलेले 'निवांत reply करू' च्या नादात विसरले असावेत 🙆‍♂️.. काही दिवसांनी त्याला व्यक्तीक विचारलं तर कळलं, पहिला reply माझाच होता.. आधीच्या तारखा full झाल्यामुळे draft बदलून पुढचा long weekend, Apr end / Labour day असा तयार झाला.. group वर पुन्हा एकदा विचारलं तर काही जण उत्सुक दिसले.. total count final होताच, वेगळा / dedicated group बनवण्यात आला आणि MH / MP safari 🛻 book झाल्या.. houseful असल्यामुळे सिल्लारी gate तेव्हडं मुकलो.. बाकी मग / so far, all was good.. so far?.. अजून तर trailer सुद्धा चालू नाही झाला..

आता वेळ होती train bookings ची.. IRCTCची reputation बघता वेगळं सांगायला नको, की इथून पुढे local slow होणार आहे..

male चितळ / हरिण

'बुधवारी office उरकून, गुरुवार दुपारची सफारी भेटावी' ह्या हेतूने पुण्यातून निघतांनाचे options होते गरीबरथ आणि आज़ाद हिंद.. गरीबरथ १७:३५ आणि दुसरी अजून तासाभराने असल्यामुळे नंतरच्या 🚂 झुगझुग गाडीने जाऊ, असं ठरलं.. आजकाल bookings २ महिन्यांनाधी चालू करतात, म्हणून थोडा अवधी होता.. शांती-शांती करत दिवस सरले आणि सुरू झाल्या bookings.. कुंडलिका descendचा trek already planned असल्यामुळे आम्हा दोघांना (+ वैभव) booking करणे जमणार नव्हते.. ह्या trekच्या सविस्तर माहिती साठी, please click here..

सकाळी ८च्या ठोक्याला महेशने booking करायला घेतले.. as usual, काही केल्या ticket book होईना 🎫 आणि groupची शांती काही वेळापुरती विस्कळीत झाली.. ताम्हिणी घाटातून आम्ही दोघं नको ते वायफळ प्रयत्न करत होतो.. काही वेळाने संतोषच्या कष्टांना यश आले.. जायची सोय होताच होती ती शांती पूर्ववत झाली..
 
when you’re a tree, but also a rock climber.

परतीच्या bookingची खिडकी अजून काही सूर्योदय बंद असणार होती.. ती उघडताक्षणी तळजाई walk नेहमीपेक्षा झटपट आवरत तासकाटा ८चा आकडा ओलांडत नाही 🕗 तर तिथल्या parking मध्येच कोडं सोडवायला घेतलं जे अर्धा तास प्रयत्न करून सुद्धा सुटलं नाही.. नाद सोडत, घरी परतल्यावर पुन्हा एकदा जोमानं केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले खरे, पण number मात्र प्रतीक्षा यादीत (WL) लागला.. अरे हो, एक सांगायचं तर राहीलच.. on paper schedule प्रमाणे येतांना झुगझूग गाड्या मागे-पुढे आहेत.. म्हणजे, गरीबरथ नंतर पोहोचत असल्यामुळे सोमवारचं office वेळेत चालू करता यावं, ह्यासाठी त्याच आज़ाद हिंदने येण्याचं ठरलं होतं 🫪.. इतर trains पेक्षा हिचं एक दिवस आधी booking चालू व्हायचा खास फायदा झाला नव्हता, कारण लांबून येत असल्यामुळे आम्हाला हव्या त्या seatsचा quota मोजकाच..

नंतर tubelight 💡 पेटली अशी की ह्या बाईसाहेब वेळेवर तयारही होत नाहीत आणि वेळेवर कधी पोहोचतही नाहीत.. बोंबला.. track record बघता half day टाकायची वेळ येणार होती.. WL clear होतील, ह्याची खात्री होती कारण आकडे मोठे नव्हते, पण half day टाकायची कोणाची मंजुरी नव्हती, specially when there are better options available.. की म्हणावं, there are 'other' options available..

दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच पडझड.. पण ह्यावेळेस कोडं अतिशय सोपं.. गरीबरथ congested असली तरी नुसतं other नसून 'better' option म्हणायला हरकत नसावी इथे.. आणि आज़ाद हिंद book झाल्यापेक्षा cancel केल्याचा आनंद जास्त होता.. reality check - सोमवारी, ह्या बाईसाहेब पुण्याला पोहोचल्या तेव्हा दुपारचे 04:40 (a depressing smiley) वाजले होते ☹️.. that explains, घड्याळाच्या दुकानातल्या घड्याळात नेहमी 10:10 (a happy smiley) का वाजले असतात 😊..

 ह्याचसाठी का केला होता अट्टाहास?

checklist मधला शेवटचा item होता camera 📸.. ज्यांच्याकडे आहे, त्यांनी घ्यायचं ठरलं - ये भी कोई बताने वाली बात है 😁.. all set to take off then.. आता राहीलं होतं नुसतं जायचं आणि यायचं - only if.. इतकं सोपं असतं तर हा blog का लिहिला असता?..

तर ह्यो व्हता trailer.. की म्हणावी प्रस्तावना?.. what follows is, 1. how it should not have been and 2. couldn't have been better - both at the same time 😜..

काला पहाड़ शेरनी (highlight of the trip)

not just a jungle.
but a living storybook.

काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा 'work from Nashik' झालं होतं.. २०२० मध्ये जसे नाशिक sideचे treks आटोपले, ह्यावेळेस ती संधी doodlesनी साधली.. जमलं तर ह्यासाठी वेगळा लेख कधीतरी सापडेल तुमच्या inbox मध्ये.. so, नाशिकला असल्यामुळे पुणे boarding 🚉 तसंही हुकणार होतं.. nearest option मनमाड हून इतरांना join व्हायचा plan b ठरला खरा, पण मग TTE आजकाल बरेच strict झाले आहेत.. ५ जण पुण्याहून जरी बसणार असले तरी माझी seat दुसऱ्याला द्यायला त्याने अजिबात second opinion घेतलं नसतं.. म्हणून स्वप्नील करवी ती सुद्धा सोय करून ठेवली होती..

सोमवारी सकाळी mobileची झोप मोड केली तर लक्षात आलं की त्याने temperatureचं 🌡️ tension घेत internet बंद पाडलंय.. असेल काही temporary glitch म्हणून थोडा वेळ वाट बघितली.. अजूनही रुसून बसल्याचं लक्षात येताच online check करून बघितलं तर ठळक अक्षरात "services suspended" वाचायला मिळालं 😳.. corporate sim असल्यामुळे मी असीमला सांगण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो.. आणि corporate sim असल्यामुळेच problem तातडीने solve होईल, ही अपेक्षाही होती..

हरिण (spotted deer) २

२९ एप्रिल - ०४ मे २०२६
बुधवार दुपार / संध्याकाळ ते सोमवार सकाळ

शांती सहन नाही झाली groupची, म्हणून आमच्या पांढऱ्या कावळ्याने चोच मारली - "कोणी cancel नाही झालं, कोणी काही update करत नाही, tripचा feel नाही आला अजून" असा त्याचा message.. आता ह्याला काय सांगावं, सोमवार पासून Trumpने इथल्या internet सोबत outgoingही अडवून ठेवलंय.. on top of this..

सुरवातीपासून इथपर्यंतचा लेख नाशिक - नागपूर bus 🚌 मध्ये बसल्यापासून पुण्याची installment नागपूरला पोहोचेपर्यंत लिहिला गेला आहे.. काहीतरी चुकल्यागत वाटलं? - train book करून busने नागपूर प्रवास? 🤨 🧐.. तर मित्रांनो, ही जाणून केलेली चूक होती, ज्याला आता plan c म्हणायचं.. कारण राहुलचं manifestation 🏁 finish line पलीकडून मिश्किलपणे आमच्यावर हसत होतं 🙂‍↔️.. जे "feel पाहिजे" म्हणाला होता - IRCTC ने ते वाजवी हट्ट पुरवले होते.. ते म्हणतात ना - भगवान के घर देर है, अंधेर नही - तसलंच काहीतरी..
 
Indian thick-knee
 
कामात थोडा break घेऊन WhatsApp बघितलं तर group शेजारी unread messagesचा '५२' आकडा बघून काहीतरी बिनसल्याचं लक्षात आलं 😳.. पहिला msg 'forwarded' म्हणून tagged होता.. crux was, 'train was delayed by 4 hrs' 🤦‍♂️.. so, तिथून पुढे ४ तासांनी चालू होणाऱ्या झुगझुग साठी आता ८ तास वाट बघावी लागणार होती, आणि उद्या दुपारची सफारी अगदी अटीतटीवर cancel होऊ बघत होती.. त्यात अजून delay होणार नाही, ह्याची guarantee घेणारं कोणी नव्हतं.. also / दुसरं म्हणजे / indicatively, मला मनमाडला जाऊन किती वेळ वाट बघावी लागेल, आता ह्याचंही काही मोजमाप राहिलं नव्हतं 😒..

नाच रे मोरा आंब्याच्या बांबूच्या वनात

irrationality personified 🤔.. आज़ाद हिंद regularly delay होते तर तिचे schedule permanently का बदलत नाही?.. किंवा हा route बंद का करत नाही?.. logistics fail होत आहेत तर जोवर परिस्थिती सुधरत नाही, तोपर्यंत नसेल route बंद करायचा तर suspend तरी करा.. नाहीच काही जमत तर कमीतकमी नाव तरी बदला - उगाच कशाला म्हणावं ना "आज़ाद हिंद".. आणि हे फक्त ह्या बाईसाहेबांच्या बाबतीत नाही हं..

irrational वाटतं आपल्याला, कारण our countrymen are full of opinions (including me).. युद्धपातळी वर काय घडत आहे, हे फक्त लढणाऱ्यांना माहिती असतं, नाही का ⁉️.. असो..
 
female spotted deer
  
सर्व options discuss झाल्यावर थेट नागपूरला ९ दरम्यान भेटायचं ठरलं.. निघायच्या ऐनवेळी देव पावला 🙏 आणि jio वाल्यांनी मेहरबानी करत services restore केल्या.. जत्रा hotelला bus stop शोधायला थोडा गोंधळ झाला, पण नागपूर पर्यंत train काय आणि bus काय, net-net एकच पडलं (होणारा खर्च आणि लागणारा वेळ as per plan a) 😇 - कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - फक्त झोप थोडी compromise करावी लागली, तेव्हडा त्रास झाल्याचा फरक.. reality check - मी नागपूरला उतरलो तेव्हा आज़ाद हिंद मनमाडला होती आणि नागपूरला पोहोचली तेव्हा आम्हाला already 🐅 sighting झाली होती..

The Jungle Book.. by Rudyard Kipling

एखाद वर्षाचा मुलगा मध्य भारतातील सिवनीच्या जंगलात हरवतो.. तो एका मादी लांडग्याला सापडतो 🐺..  आणि पुढे काय होतं, हे वेगळं सांगायला नको.. हे सिवनीचं जंगल म्हणजे Pench.. not just a jungle, but a living storybook 📖.. अर्थात, आम्ही Kiplingने इथे आखलेल्या त्या कल्पनेची सैर करणार होतो.. मोगली ने काय जे जगलं, ते आम्ही चिमूटभर का होईना अनुभवणार होतो..
 
बिंदू (the unlawful sighting)
 
when search history hits the algorithm.
 
the feel.. Pench
photo credits: महेश, वैभव, अमरजीत

नागपूर ते जबलपूर majority area हा सिवनी जिल्ह्यात मोडतो.. जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिमेकडे असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला इथल्या नदीचं नाव दिलं आहे - पेंच.. सहसा अश्या प्रकल्पांमध्ये sighting साठी / तिथले वन्यप्राणी बघायला सफारीची सोय असते.. फिरायला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यातून स्वतंत्र gates आहेत ⛩️.. प्रत्येक gateला त्याचा area / zone विभागून दिलेला आहे.. zone २ प्रकारचे आहेत / असतात - core आणि buffer.. core पूर्णपणे नैसर्गिक असतो - वस्ती नसते, इथले resources कोणी, किंवा आसपासच्या गाववाले कुठल्या purposes साठी कापू / वापरू शकत नाही etc... सफारी मात्र दोन्ही zones मध्ये होतात 🚙.. प्रत्येक zoneचा area ठरलेला असतो.. sighting शक्यतो जलाशयाजवळ होते.. दुसरी शक्यता असते शिकार केल्याच्या ठिकाणी, जी again, mostly जलाशयाजवळ असते.. एकदा शिकार झाल्यावर ती संपेपर्यंत शिकारी प्राणी तिथून हलत नसतात.. sightingची तिसरी शक्यता असते callingच्या वेळेस 📣.. बरं, calling म्हणजे एखादा हिंस्र प्राणी जंगलातल्या इतर शाकाहारी किंवा लहान प्राण्यांना दिसला की ते इतरांना (जसे की हरिण, सांबर, माकड) धोक्याची सूचना देण्यासाठी विशिष्ट आवाज काढतात.. चौथी शक्यता - काल दिसला तिथे आज किंवा सकाळी दिसला तिथे संध्याकाळी 😆..

with that prologue, let's explore Mowgli's den, चिमूटभर..

stillness personified

सफारी १ - खुर्सापार (संध्याकाळ)
बारसच्या २ लेकी, b1 आणि b2.. b2 ला २+२, असे ४ अपत्य.. खुर्सापार zone मध्ये ह्या पैकी b2 आणि तिची मोठी लेक असते / दिसते / दिसले 👍.. तत्पूर्वी / halftime पर्यंत आम्ही वाघाची sighting नाही होणार ह्या हिशोबाने विविध पक्षी आणि प्राणी बघायचा आनंद घेत होतो.. हरिण, लंगूर, दुरवर सांबर आणि भरपूर पक्षी.. तळजाई पेक्षा इथे जरा मोठे आणि अजूनही शिल्लक असणाऱ्या पिसांसोबत मोर बघायला मिळाले..
काही दिवसागोदर शिकार झाल्याचं माहिती होतं म्हणून second innings मध्ये guideने gypsy उसरीपार तलावाकडे वळवली.. बऱ्याच वेळानी 'सब्र के फल' की मिठास द्यायला b2 अंगडाई देत उठली (२००+ मी.).. पैसे वसूल झाले होते, तरी सोने पे सुहागा होती तिची लेक, जी डावीकडून तिच्या रुबाबदार style मध्ये आमच्या दिशेने येत होती (२५०+ मी.).. magical moments of the trip.. or, 'so far'?
 
b2 / panthera tigris
 
सफारी २ - टुरिया (सकाळ)
gypsy वाल्यांचा थोडा गोंधळ झाल्याचा फायदा आम्हाला असा झाला की अगदी जवळून KP ने cross केले.. तत्पूर्वी, भरपूर असणाऱ्या ह्या zone मध्ये आम्हाला मुबलक हरिणांनी 🦌 दर्शन दिले.. ऋतूनुसार रंग बदलणारे, सध्या पांढरे ghost tree सुद्धा इथे दिसले.. इतर रंग - हिरवा (पावसाळा) आणि गुलाबी (हिवाळा).. ह्या भागात पेंच नदी सुद्धा आहे म्हणून हरियाली आणि visibilityही जास्त.. नदीपर्यंत जाता-येता बरेच मोर दिसले 🦚.. सुरवातीला पिसारा फुलवलेल्याला cameraत कैद केलं.. तिथून पुढे जात नाही तर उजवीकडून डावीकडे "काला पहाड़" शेरनी cross झाली (१०-१२ मी.).. सफारी चालू झाल्या-झाल्याच आजचं target पूर्ण झालं होतं, जे ह्या संपूर्ण tripचं highlight सुद्धा होतं 😎.. 
सफारी / gypsy एकमेकांना cross होतांना guide / मार्गदर्शक त्यांच्या आदिवासी गोंडी भाषेत sighting / no sighting बद्दल एकमेकांना जे सांगत असतात, त्यात एका male adult बद्दल कळलं.. आळशी म्हणावं का मनमौजी - ढेपाळल्यागत आडवा होऊन भाई हलायलाच तयार नाही (~२०० मी.).. मोजून २ सेकंद तो उठला काय, आणि त्याची size बघून आम्ही चाट पडावं काय !?.. मज़ा आ गया 👌..
पुढे 'cherry on the cake' momentच्या स्वरूपात आम्हाला जोडीने कोल्हे / jackal दिसले 🦊..

Indian roller / नीळकंठ / नीलपंख

सफारी ३ - रुखड़ (संध्याकाळ)
ही सफारी highway के उस पार वाली होती.. पूर्वेकडील MPच्या दोनमेव zones मधील एक, दुसरा मसुरनाला.. आणि आमच्या plan मधला एकमेव buffer zone.. म्हणून sightingची अपेक्षा न ठेवता आम्ही फक्त जंगल बघायला निघालो होतो.. terrain बऱ्यापैकी uneven.. त्यात झाडं इतके की visibility काहीच नाही.. कालच्या आणि सकाळच्या too good luckला compensate करत आज नंदरुक जलाशय सोडून आम्ही पुढे आलो, तेव्हा rocky 🐆 तिथून गेल्याचं कळलं.. guide नुसार, 'यहां की females roadshow नहीं करती', पण rocky (बिबट) दिसला एकाला तर सगळ्यांना दिसतो, असंही कळलं.. आजचा दिस - was an exception..
अगदीच निराश होऊन gate बाहेर निघण्यापेक्षा गवे 🦬 आणि hornbill पक्ष्यांचे भरपूर sighting झाले.. निघतांना सांबरने call दिल्याचा आवाज येताच तातडीने त्या दिशेने फिरलो खरं, पण नुसतं त्याच्याच sighting वर समाधान मानावं लागलं..
 
gaur / Indian bison / गवा

सफारी ४ - खुर्सापार (सकाळ)
परवा पेक्षा आज सगळच ओसाड होतं.. बोटांवर मोजण्याइतके प्राणी दिसल्यामुळे थोडी नाराज़गी होती 😞.. परवा बिंदू नव्हती दिसली, आज तिचे sightingचे प्रयत्न चालू होते.. कालच्या तिच्या locationच्या आसपास थोडा वेळ वाट बघितली - no luck.. 'ही नाही तर b2 पुन्हा दिसते का?', म्हणून उसरीपार तलावाजवळ जाऊन वाट बघितली - no luck 😔.. काल संध्याकाळची पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली - halftime पर्यंत सगळ्यांचे चेहरे पडले होते.. कालच्या नाल्याजवळ पुन्हा जात, तिची काही हालचाल नसल्याचं लक्षात घेत, (कोणाला सांगू नका बरं 🤫) आमचे guide मित्र थोडं अवैध काम करत आम्हाला तिने दर्शन नाही दिले म्हणून काय झालं, तिचे दर्शन घ्यायला घेऊन गेले (~५० मी.).. परतल्यावर driverने गाडी मागे पुढे करत गुन्हा केल्याचे पुरावे / tyre marks ही गुडूप केले.. सांगू नका कोणाला - तेरी भी चुप, मेरी भी चुप 🤐..
परततांना अजून पर्यंत स्पष्ट आणि जवळून न दिसलेले सांबर आज बरेच मेहरबान होते..

सांबर deer

सफारी ५ - टुरिया (संध्याकाळ)
दुसरीचं revision म्हणून ही full-n-final.. परीक्षेला बसलो तर syllabus बाहेरचा प्रश्न आला, पाऊस.. काल दुपारी निघायच्या आधी जो धो-धो झाल्यामुळे सफारी cancel होते का काय, वाटत होतं, ती सफारी अगदी व्यवस्थित झाली आणि आज दुपारी निघतांना जे भाजून निघालो ☀️ त्याची ही तासाभरात कायापालट 🌦️.. ये-जा करत त्याने सगळी मजा घालवली.. असो.. २ ऐवजी १, वाघ आणि कोल्हा cameraत सोबत घेऊन आम्ही ह्या प्रकल्पाचा निरोप घेतला.. वाघ. तोच. मनमौजी, जागा सुद्धा तीच (~२०० मी.).. 'अपनी मर्ज़ी का मालक' का जीता जागता और सटीक उदाहरण.. वैतागून विचार आला, 'दगड फेकून मारावा का?', म्हणजे काही हालचाल तरी नज़रबंद नज़रेत बंद करता येईल - just joking 🤠 - असले stunt कधी चुकून सुद्धा करू नका बरं - तुमच्या ऐवजी तोच चांगला feel घेईल मग..
कर्माझीरी gateच्या सफारी सुद्धा इथे येतात, म्हणून ह्याला बघायला बरीच demand होती, पण त्यो नुसता माशी उठवायला जितके हातवारे करावे लागतील, तितकीच हालचाल करीत होता 🫩..

eyes on the prize, कोल्हा / golden jackal

that should be article's full stop then.. इतनी आसानी से नही, क्योंकि picture अभी बाकी है मेरे दोस्त.. well, this time literally.. नागपूरच्या उन्हात ६ पर्यंत काय करायचं?.. only personified rational option was - resort हुन लवकर निघुन movie 🎥 बघायला जाणे.. and that concludes first of its kind - the feel - व्याघ्र प्रकल्पातील एक अविस्मरणीय wildlife सफारी.. #CannotAskForMore  

Doodles 3

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे.. Doodles 3 काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा ...