Sunday, 10 May 2026

Doodles 3

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे.. Doodles 3

काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा 'work from Nashik' झालं होतं.. २०२० मध्ये जसे नाशिक sideचे treks आटोपले, ह्यावेळेस ती संधी doodlesनी साधली.. जमलं तर ह्यासाठी वेगळा लेख कधीतरी सापडेल तुमच्या inbox मध्ये.. Pench article मध्ये कबूल केलं म्हणून निम्नलिखीत.. अगदी थोडक्यात..

Challenges force us to search for a new center of gravity..

Krissh movieचा sequel जसा Krissh 3 🎭 होता, तसंच doodles नंतर हा doodles 3 लेख.. कारण असं की ह्यात अलीकडे बनवलेले doodles आहेत, all of them on youth festival ground 🏟️.. पहिल्या article नंतरचे आणि ह्या article मधल्यांच्या आधीच्यांच्या साठी, doodles 2 sequel-cum-prequel article पुढील काही दिवसात 😝..

विशेष काय?.. तर सर्व free hand आहेत, rather "free leg".. कुठेही teleporting नाही, आणि main म्हणजे, अनपेक्षितपणे सुरेख बनलेल्या आकृत्या.. 🥳 तरी, वाचून लक्षात येईलच, पहिल्या article प्रमाणे शब्द माझे नाहीत.. तरी..


the melody queen left a void.. आशा ताईंचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे, तर भावनांचा एक अथांग सागर होता / आहे / नेहमीच राहील.. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, हे पाऊल-चिन्ह, त्यांच्या अजरामर गाण्यांना वाहिलेली आमच्या style मधली श्रद्धांजली 💐..


मैदानाच्या विस्तीर्ण पटलावर जेव्हा आपल्या देशाचा नकाशा 🇮🇳 काढला, तेव्हा मनात एक वेगळाच अभिमान दाटून आला.. surprisingly random. 
unpredictably clean. short and proud.. केवळ एक रेखाटन नसून, आपल्या विविधतेतील एकतेचे आणि अथांग सीमांचे प्रतीक..


दृष्टीभ्रम निर्माण करणारा हा चौकोन म्हणजे जीवनातील गुंतागुंतीचे दर्शन.. पाहताना जे अशक्य वाटते, ते कल्पकतेने आणि जिद्दीने प्रत्यक्षात उतरवता येते, हीच ह्या doodleची शिकवण.. impossible square 


तंत्रज्ञानाच्या युगातील एक छोटेसे पण क्रांती घडवणारे साधन.. या आयताकृती आकारातून आपण अगदी सहजरित्या एकमेकांशी आज संवाद साधतो.. आणि ह्यामुळेच आमच्यासारखे आज दीवार मधला dialogue perform करू शकतात, आज मेरे पास गाडी है, बंगला घर है अगैरे वगैरे.. 😀


निळ्या नभास स्पर्धा करणारा पतंग आणि त्याला सावरणारी ती नाजूक कन्नी.. 🪁 मुक्त भरारी घेण्याची ओढ आणि at the same time, आपल्या मुळांशी घट्ट जोडले राहण्याचे एक सुंदर समीकरण..


आपल्या संस्कृतीतील पारंपरिक खेळांची आठवण करून देणारा हा 'चल्लस'.. साध्या रेषांमधून जुन्या आठवणींना उजाळा देत, या पटावरील, rather पाटा मागचा वारशाचे digital स्वरूप..


अनेक पिढ्यांचे मनोरंजन करणारा हा साध्या चौकटींचा दुसरा खेळ..


आईच्या साठीनिमित्त 🎂 ह्या तिला एक आगळ्या प्रकारे दिलेल्या शुभेच्छा हार्दिक..


कामाच्या गडबडीत ऊर्जेचा स्रोत - a cup of tea ☕.. त्यात office मधला असला तर कधी-कधी सोबतीला असते अशी ठुमकणारी आणि लटकणारी ती चहाची पिशवी / tea-bag..


विश्वाचा आदिम ध्वनी आणि मनाला शांती देणारे प्रतीक - ॐ.. एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देण्याचा हा एक छोटुसा प्रयत्न.. 🕉️


भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाणारे प्रतीक.. चारही दिशांनी येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे ⚡ आणि मांगल्याचे दर्शन..


and the best of all needs no caption..


the last one, back to आशा ताई.. गाणं सुद्धा शब्दांच्या थोड्याफार हेरा-फेरीने तेच.. काळाचे मोल सांगणारे हे एक प्राचीन साधन.. जो बीत रहा है ⏳ - वह समय नहीं, जीवन है.


अजून मग, भेटू लवकरच sequel-cum-prequel मध्ये.. तब तक..

Just move.
One breath. One step. One beat.

annexure

article on Doodle

article on Pench

Thursday, 7 May 2026

Pench

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.. Pench..
when search history hits the algorithm

unतूफ़ानी trek जसा "trek" होत नसतो, तसंच सर्व plans सुरळीत पार पडले असते तर blogs का लिहिले गेले असते? 😃.. scrollingच्या जगात आजही scribblingची आवड जपणारे तुम्ही वाचक आहात, म्हणून हा blog, आणि सिंहगडावर बिबट्या दिसूनही wildlife reserves आहेत म्हणून Pench सफारी 🐅..

तरी शेवटी प्रश्न एकच असतो / आहे / उरतो - "का?".. मग ते "5 Whys" RCA असो, Sinek असो किंवा पांढरा कावळा 🐦‍⬛.. राहुलने तो message करावा काय आणि नुसता त्यानेच नव्हे तर सगळ्यांनी त्याचा feel घ्यावा काय? 😏.. आखिर क्यूं?.. Why?..

सहसा सगळं सुटसुटीत असलेल्या plan नुसार घडत असेल तर मुद्द्याचं discuss करायला as such काही नसतं.. म्हणजे, Good Morning आणि Happy Birthday वाल्या VIP दुनियेशी संबंध नसला आणि सगळ्यांचे रहमानी 🐞 अगदी माणसागत वागत असतील तर बनवण्यात आलेल्या WhatsApp group वर राज़ चलचित्रातल्या 'यहां पे सब शांति शांति है' गाणं सोडलं तर अजून कसली कुजबुज नसते / नसायला हवी.. but then, रहमान नुसता डकैत नव्हता..

इतपर्यंत नसेल काही कळलं तर load घेऊ नका.. गोष्ट अजून सुरू झालेली नाही 😐..
 

so, शुरू से शुरू करते हैं..

some days ago महेशने main group वर message केला.. खूप जास्त flashback झाला का?.. गरजेचं आहे, नाहीतर हे सर्व अमूर्त मुद्दे मृतच राहतील.. so again..

some days ago महेशने "anybody interested in Pench?" असा main group वर "train travel, Good Friday आणि एक leave", असा message draft करीत sendला 📨.. कामाच्या गडबडीत किंवा messagesच्या महापुरात, कदाचित काहींचं लक्ष नसेल गेलं.. काहींना ह्याचं कुतूहल नसावं आणि राहिलेले 'निवांत reply करू' च्या नादात विसरले असावेत 🙆‍♂️.. काही दिवसांनी त्याला व्यक्तीक विचारलं तर कळलं, पहिला reply माझाच होता.. आधीच्या तारखा full झाल्यामुळे draft बदलून पुढचा long weekend, Apr end / Labour day असा तयार झाला.. group वर पुन्हा एकदा विचारलं तर काही जण उत्सुक दिसले.. total count final होताच, वेगळा / dedicated group बनवण्यात आला आणि MH / MP safari 🛻 book झाल्या.. houseful असल्यामुळे सिल्लारी gate तेव्हडं मुकलो.. बाकी मग / so far, all was good.. so far?.. अजून तर trailer सुद्धा चालू नाही झाला..

आता वेळ होती train bookings ची.. IRCTCची reputation बघता वेगळं सांगायला नको, की इथून पुढे local slow होणार आहे..

male चितळ / हरिण

'बुधवारी office उरकून, गुरुवार दुपारची सफारी भेटावी' ह्या हेतूने पुण्यातून निघतांनाचे options होते गरीबरथ आणि आज़ाद हिंद.. गरीबरथ १७:३५ आणि दुसरी अजून तासाभराने असल्यामुळे नंतरच्या 🚂 झुगझुग गाडीने जाऊ, असं ठरलं.. आजकाल bookings २ महिन्यांनाधी चालू करतात, म्हणून थोडा अवधी होता.. शांती-शांती करत दिवस सरले आणि सुरू झाल्या bookings.. कुंडलिका descendचा trek already planned असल्यामुळे आम्हा दोघांना (+ वैभव) booking करणे जमणार नव्हते.. ह्या trekच्या सविस्तर माहिती साठी, please click here..

सकाळी ८च्या ठोक्याला महेशने booking करायला घेतले.. as usual, काही केल्या ticket book होईना 🎫 आणि groupची शांती काही वेळापुरती विस्कळीत झाली.. ताम्हिणी घाटातून आम्ही दोघं नको ते वायफळ प्रयत्न करत होतो.. काही वेळाने संतोषच्या कष्टांना यश आले.. जायची सोय होताच होती ती शांती पूर्ववत झाली..
 
when you’re a tree, but also a rock climber.

परतीच्या bookingची खिडकी अजून काही सूर्योदय बंद असणार होती.. ती उघडताक्षणी तळजाई walk नेहमीपेक्षा झटपट आवरत तासकाटा ८चा आकडा ओलांडत नाही 🕗 तर तिथल्या parking मध्येच कोडं सोडवायला घेतलं जे अर्धा तास प्रयत्न करून सुद्धा सुटलं नाही.. नाद सोडत, घरी परतल्यावर पुन्हा एकदा जोमानं केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले खरे, पण number मात्र प्रतीक्षा यादीत (WL) लागला.. अरे हो, एक सांगायचं तर राहीलच.. on paper schedule प्रमाणे येतांना झुगझूग गाड्या मागे-पुढे आहेत.. म्हणजे, गरीबरथ नंतर पोहोचत असल्यामुळे सोमवारचं office वेळेत चालू करता यावं, ह्यासाठी त्याच आज़ाद हिंदने येण्याचं ठरलं होतं 🫪.. इतर trains पेक्षा हिचं एक दिवस आधी booking चालू व्हायचा खास फायदा झाला नव्हता, कारण लांबून येत असल्यामुळे आम्हाला हव्या त्या seatsचा quota मोजकाच..

नंतर tubelight 💡 पेटली अशी की ह्या बाईसाहेब वेळेवर तयारही होत नाहीत आणि वेळेवर कधी पोहोचतही नाहीत.. बोंबला.. track record बघता half day टाकायची वेळ येणार होती.. WL clear होतील, ह्याची खात्री होती कारण आकडे मोठे नव्हते, पण half day टाकायची कोणाची मंजुरी नव्हती, specially when there are better options available.. की म्हणावं, there are 'other' options available..

दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच पडझड.. पण ह्यावेळेस कोडं अतिशय सोपं.. गरीबरथ congested असली तरी नुसतं other नसून 'better' option म्हणायला हरकत नसावी इथे.. आणि आज़ाद हिंद book झाल्यापेक्षा cancel केल्याचा आनंद जास्त होता.. reality check - सोमवारी, ह्या बाईसाहेब पुण्याला पोहोचल्या तेव्हा दुपारचे 04:40 (a depressing smiley) वाजले होते ☹️.. that explains, घड्याळाच्या दुकानातल्या घड्याळात नेहमी 10:10 (a happy smiley) का वाजले असतात 😊..

 ह्याचसाठी का केला होता अट्टाहास?

checklist मधला शेवटचा item होता camera 📸.. ज्यांच्याकडे आहे, त्यांनी घ्यायचं ठरलं - ये भी कोई बताने वाली बात है 😁.. all set to take off then.. आता राहीलं होतं नुसतं जायचं आणि यायचं - only if.. इतकं सोपं असतं तर हा blog का लिहिला असता?..

तर ह्यो व्हता trailer.. की म्हणावी प्रस्तावना?.. what follows is, 1. how it should not have been and 2. couldn't have been better - both at the same time 😜..

काला पहाड़ शेरनी (highlight of the trip)

not just a jungle.
but a living storybook.

काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा 'work from Nashik' झालं होतं.. २०२० मध्ये जसे नाशिक sideचे treks आटोपले, ह्यावेळेस ती संधी doodlesनी साधली.. जमलं तर ह्यासाठी वेगळा लेख कधीतरी सापडेल तुमच्या inbox मध्ये.. so, नाशिकला असल्यामुळे पुणे boarding 🚉 तसंही हुकणार होतं.. nearest option मनमाड हून इतरांना join व्हायचा plan b ठरला खरा, पण मग TTE आजकाल बरेच strict झाले आहेत.. ५ जण पुण्याहून जरी बसणार असले तरी माझी seat दुसऱ्याला द्यायला त्याने अजिबात second opinion घेतलं नसतं.. म्हणून स्वप्नील करवी ती सुद्धा सोय करून ठेवली होती..

सोमवारी सकाळी mobileची झोप मोड केली तर लक्षात आलं की त्याने temperatureचं 🌡️ tension घेत internet बंद पाडलंय.. असेल काही temporary glitch म्हणून थोडा वेळ वाट बघितली.. अजूनही रुसून बसल्याचं लक्षात येताच online check करून बघितलं तर ठळक अक्षरात "services suspended" वाचायला मिळालं 😳.. corporate sim असल्यामुळे मी असीमला सांगण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो.. आणि corporate sim असल्यामुळेच problem तातडीने solve होईल, ही अपेक्षाही होती..

हरिण (spotted deer) २

२९ एप्रिल - ०४ मे २०२६
बुधवार दुपार / संध्याकाळ ते सोमवार सकाळ

शांती सहन नाही झाली groupची, म्हणून आमच्या पांढऱ्या कावळ्याने चोच मारली - "कोणी cancel नाही झालं, कोणी काही update करत नाही, tripचा feel नाही आला अजून" असा त्याचा message.. आता ह्याला काय सांगावं, सोमवार पासून Trumpने इथल्या internet सोबत outgoingही अडवून ठेवलंय.. on top of this..

सुरवातीपासून इथपर्यंतचा लेख नाशिक - नागपूर bus 🚌 मध्ये बसल्यापासून पुण्याची installment नागपूरला पोहोचेपर्यंत लिहिला गेला आहे.. काहीतरी चुकल्यागत वाटलं? - train book करून busने नागपूर प्रवास? 🤨 🧐.. तर मित्रांनो, ही जाणून केलेली चूक होती, ज्याला आता plan c म्हणायचं.. कारण राहुलचं manifestation 🏁 finish line पलीकडून मिश्किलपणे आमच्यावर हसत होतं 🙂‍↔️.. जे "feel पाहिजे" म्हणाला होता - IRCTC ने ते वाजवी हट्ट पुरवले होते.. ते म्हणतात ना - भगवान के घर देर है, अंधेर नही - तसलंच काहीतरी..
 
Indian thick-knee
 
कामात थोडा break घेऊन WhatsApp बघितलं तर group शेजारी unread messagesचा '५२' आकडा बघून काहीतरी बिनसल्याचं लक्षात आलं 😳.. पहिला msg 'forwarded' म्हणून tagged होता.. crux was, 'train was delayed by 4 hrs' 🤦‍♂️.. so, तिथून पुढे ४ तासांनी चालू होणाऱ्या झुगझुग साठी आता ८ तास वाट बघावी लागणार होती, आणि उद्या दुपारची सफारी अगदी अटीतटीवर cancel होऊ बघत होती.. त्यात अजून delay होणार नाही, ह्याची guarantee घेणारं कोणी नव्हतं.. also / दुसरं म्हणजे / indicatively, मला मनमाडला जाऊन किती वेळ वाट बघावी लागेल, आता ह्याचंही काही मोजमाप राहिलं नव्हतं 😒..

नाच रे मोरा आंब्याच्या बांबूच्या वनात

irrationality personified 🤔.. आज़ाद हिंद regularly delay होते तर तिचे schedule permanently का बदलत नाही?.. किंवा हा route बंद का करत नाही?.. logistics fail होत आहेत तर जोवर परिस्थिती सुधरत नाही, तोपर्यंत नसेल route बंद करायचा तर suspend तरी करा.. नाहीच काही जमत तर कमीतकमी नाव तरी बदला - उगाच कशाला म्हणावं ना "आज़ाद हिंद".. आणि हे फक्त ह्या बाईसाहेबांच्या बाबतीत नाही हं..

irrational वाटतं आपल्याला, कारण our countrymen are full of opinions (including me).. युद्धपातळी वर काय घडत आहे, हे फक्त लढणाऱ्यांना माहिती असतं, नाही का ⁉️.. असो..
 
female spotted deer
  
सर्व options discuss झाल्यावर थेट नागपूरला ९ दरम्यान भेटायचं ठरलं.. निघायच्या ऐनवेळी देव पावला 🙏 आणि jio वाल्यांनी मेहरबानी करत services restore केल्या.. जत्रा hotelला bus stop शोधायला थोडा गोंधळ झाला, पण नागपूर पर्यंत train काय आणि bus काय, net-net एकच पडलं (होणारा खर्च आणि लागणारा वेळ as per plan a) 😇 - कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - फक्त झोप थोडी compromise करावी लागली, तेव्हडा त्रास झाल्याचा फरक.. reality check - मी नागपूरला उतरलो तेव्हा आज़ाद हिंद मनमाडला होती आणि नागपूरला पोहोचली तेव्हा आम्हाला already 🐅 sighting झाली होती..

The Jungle Book.. by Rudyard Kipling

एखाद वर्षाचा मुलगा मध्य भारतातील सिवनीच्या जंगलात हरवतो.. तो एका मादी लांडग्याला सापडतो 🐺..  आणि पुढे काय होतं, हे वेगळं सांगायला नको.. हे सिवनीचं जंगल म्हणजे Pench.. not just a jungle, but a living storybook 📖.. अर्थात, आम्ही Kiplingने इथे आखलेल्या त्या कल्पनेची सैर करणार होतो.. मोगली ने काय जे जगलं, ते आम्ही चिमूटभर का होईना अनुभवणार होतो..
 
बिंदू (the unlawful sighting)
 
when search history hits the algorithm.
 
the feel.. Pench
photo credits: महेश, वैभव, अमरजीत

नागपूर ते जबलपूर majority area हा सिवनी जिल्ह्यात मोडतो.. जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिमेकडे असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला इथल्या नदीचं नाव दिलं आहे - पेंच.. सहसा अश्या प्रकल्पांमध्ये sighting साठी / तिथले वन्यप्राणी बघायला सफारीची सोय असते.. फिरायला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यातून स्वतंत्र gates आहेत ⛩️.. प्रत्येक gateला त्याचा area / zone विभागून दिलेला आहे.. zone २ प्रकारचे आहेत / असतात - core आणि buffer.. core पूर्णपणे नैसर्गिक असतो - वस्ती नसते, इथले resources कोणी, किंवा आसपासच्या गाववाले कुठल्या purposes साठी कापू / वापरू शकत नाही etc... सफारी मात्र दोन्ही zones मध्ये होतात 🚙.. प्रत्येक zoneचा area ठरलेला असतो.. sighting शक्यतो जलाशयाजवळ होते.. दुसरी शक्यता असते शिकार केल्याच्या ठिकाणी, जी again, mostly जलाशयाजवळ असते.. एकदा शिकार झाल्यावर ती संपेपर्यंत शिकारी प्राणी तिथून हलत नसतात.. sightingची तिसरी शक्यता असते callingच्या वेळेस 📣.. बरं, calling म्हणजे एखादा हिंस्र प्राणी जंगलातल्या इतर शाकाहारी किंवा लहान प्राण्यांना दिसला की ते इतरांना (जसे की हरिण, सांबर, माकड) धोक्याची सूचना देण्यासाठी विशिष्ट आवाज काढतात.. चौथी शक्यता - काल दिसला तिथे आज किंवा सकाळी दिसला तिथे संध्याकाळी 😆..

with that prologue, let's explore Mowgli's den, चिमूटभर..

stillness personified

सफारी १ - खुर्सापार (संध्याकाळ)
बारसच्या २ लेकी, b1 आणि b2.. b2 ला २+२, असे ४ अपत्य.. खुर्सापार zone मध्ये ह्या पैकी b2 आणि तिची मोठी लेक असते / दिसते / दिसले 👍.. तत्पूर्वी / halftime पर्यंत आम्ही वाघाची sighting नाही होणार ह्या हिशोबाने विविध पक्षी आणि प्राणी बघायचा आनंद घेत होतो.. हरिण, लंगूर, दुरवर सांबर आणि भरपूर पक्षी.. तळजाई पेक्षा इथे जरा मोठे आणि अजूनही शिल्लक असणाऱ्या पिसांसोबत मोर बघायला मिळाले..
काही दिवसागोदर शिकार झाल्याचं माहिती होतं म्हणून second innings मध्ये guideने gypsy उसरीपार तलावाकडे वळवली.. बऱ्याच वेळानी 'सब्र के फल' की मिठास द्यायला b2 अंगडाई देत उठली (२००+ मी.).. पैसे वसूल झाले होते, तरी सोने पे सुहागा होती तिची लेक, जी डावीकडून तिच्या रुबाबदार style मध्ये आमच्या दिशेने येत होती (२५०+ मी.).. magical moments of the trip.. or, 'so far'?
 
b2 / panthera tigris
 
सफारी २ - टुरिया (सकाळ)
gypsy वाल्यांचा थोडा गोंधळ झाल्याचा फायदा आम्हाला असा झाला की अगदी जवळून KP ने cross केले.. तत्पूर्वी, भरपूर असणाऱ्या ह्या zone मध्ये आम्हाला मुबलक हरिणांनी 🦌 दर्शन दिले.. ऋतूनुसार रंग बदलणारे, सध्या पांढरे ghost tree सुद्धा इथे दिसले.. इतर रंग - हिरवा (पावसाळा) आणि गुलाबी (हिवाळा).. ह्या भागात पेंच नदी सुद्धा आहे म्हणून हरियाली आणि visibilityही जास्त.. नदीपर्यंत जाता-येता बरेच मोर दिसले 🦚.. सुरवातीला पिसारा फुलवलेल्याला cameraत कैद केलं.. तिथून पुढे जात नाही तर उजवीकडून डावीकडे "काला पहाड़" शेरनी cross झाली (१०-१२ मी.).. सफारी चालू झाल्या-झाल्याच आजचं target पूर्ण झालं होतं, जे ह्या संपूर्ण tripचं highlight सुद्धा होतं 😎.. 
सफारी / gypsy एकमेकांना cross होतांना guide / मार्गदर्शक त्यांच्या आदिवासी गोंडी भाषेत sighting / no sighting बद्दल एकमेकांना जे सांगत असतात, त्यात एका male adult बद्दल कळलं.. आळशी म्हणावं का मनमौजी - ढेपाळल्यागत आडवा होऊन भाई हलायलाच तयार नाही (~२०० मी.).. मोजून २ सेकंद तो उठला काय, आणि त्याची size बघून आम्ही चाट पडावं काय !?.. मज़ा आ गया 👌..
पुढे 'cherry on the cake' momentच्या स्वरूपात आम्हाला जोडीने कोल्हे / jackal दिसले 🦊..

Indian roller / नीळकंठ / नीलपंख

सफारी ३ - रुखड़ (संध्याकाळ)
ही सफारी highway के उस पार वाली होती.. पूर्वेकडील MPच्या दोनमेव zones मधील एक, दुसरा मसुरनाला.. आणि आमच्या plan मधला एकमेव buffer zone.. म्हणून sightingची अपेक्षा न ठेवता आम्ही फक्त जंगल बघायला निघालो होतो.. terrain बऱ्यापैकी uneven.. त्यात झाडं इतके की visibility काहीच नाही.. कालच्या आणि सकाळच्या too good luckला compensate करत आज नंदरुक जलाशय सोडून आम्ही पुढे आलो, तेव्हा rocky 🐆 तिथून गेल्याचं कळलं.. guide नुसार, 'यहां की females roadshow नहीं करती', पण rocky (बिबट) दिसला एकाला तर सगळ्यांना दिसतो, असंही कळलं.. आजचा दिस - was an exception..
अगदीच निराश होऊन gate बाहेर निघण्यापेक्षा गवे 🦬 आणि hornbill पक्ष्यांचे भरपूर sighting झाले.. निघतांना सांबरने call दिल्याचा आवाज येताच तातडीने त्या दिशेने फिरलो खरं, पण नुसतं त्याच्याच sighting वर समाधान मानावं लागलं..
 
gaur / Indian bison / गवा

सफारी ४ - खुर्सापार (सकाळ)
परवा पेक्षा आज सगळच ओसाड होतं.. बोटांवर मोजण्याइतके प्राणी दिसल्यामुळे थोडी नाराज़गी होती 😞.. परवा बिंदू नव्हती दिसली, आज तिचे sightingचे प्रयत्न चालू होते.. कालच्या तिच्या locationच्या आसपास थोडा वेळ वाट बघितली - no luck.. 'ही नाही तर b2 पुन्हा दिसते का?', म्हणून उसरीपार तलावाजवळ जाऊन वाट बघितली - no luck 😔.. काल संध्याकाळची पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली - halftime पर्यंत सगळ्यांचे चेहरे पडले होते.. कालच्या नाल्याजवळ पुन्हा जात, तिची काही हालचाल नसल्याचं लक्षात घेत, (कोणाला सांगू नका बरं 🤫) आमचे guide मित्र थोडं अवैध काम करत आम्हाला तिने दर्शन नाही दिले म्हणून काय झालं, तिचे दर्शन घ्यायला घेऊन गेले (~५० मी.).. परतल्यावर driverने गाडी मागे पुढे करत गुन्हा केल्याचे पुरावे / tyre marks ही गुडूप केले.. सांगू नका कोणाला - तेरी भी चुप, मेरी भी चुप 🤐..
परततांना अजून पर्यंत स्पष्ट आणि जवळून न दिसलेले सांबर आज बरेच मेहरबान होते..

सांबर deer

सफारी ५ - टुरिया (संध्याकाळ)
दुसरीचं revision म्हणून ही full-n-final.. परीक्षेला बसलो तर syllabus बाहेरचा प्रश्न आला, पाऊस.. काल दुपारी निघायच्या आधी जो धो-धो झाल्यामुळे सफारी cancel होते का काय, वाटत होतं, ती सफारी अगदी व्यवस्थित झाली आणि आज दुपारी निघतांना जे भाजून निघालो ☀️ त्याची ही तासाभरात कायापालट 🌦️.. ये-जा करत त्याने सगळी मजा घालवली.. असो.. २ ऐवजी १, वाघ आणि कोल्हा cameraत सोबत घेऊन आम्ही ह्या प्रकल्पाचा निरोप घेतला.. वाघ. तोच. मनमौजी, जागा सुद्धा तीच (~२०० मी.).. 'अपनी मर्ज़ी का मालक' का जीता जागता और सटीक उदाहरण.. वैतागून विचार आला, 'दगड फेकून मारावा का?', म्हणजे काही हालचाल तरी नज़रबंद नज़रेत बंद करता येईल - just joking 🤠 - असले stunt कधी चुकून सुद्धा करू नका बरं - तुमच्या ऐवजी तोच चांगला feel घेईल मग..
कर्माझीरी gateच्या सफारी सुद्धा इथे येतात, म्हणून ह्याला बघायला बरीच demand होती, पण त्यो नुसता माशी उठवायला जितके हातवारे करावे लागतील, तितकीच हालचाल करीत होता 🫩..

eyes on the prize, कोल्हा / golden jackal

that should be article's full stop then.. इतनी आसानी से नही, क्योंकि picture अभी बाकी है मेरे दोस्त.. well, this time literally.. नागपूरच्या उन्हात ६ पर्यंत काय करायचं?.. only personified rational option was - resort हुन लवकर निघुन movie 🎥 बघायला जाणे.. and that concludes first of its kind - the feel - व्याघ्र प्रकल्पातील एक अविस्मरणीय wildlife सफारी.. #CannotAskForMore  

Saturday, 7 March 2026

home ground

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

उद्या भारत 🇮🇳 जिंकेल का 🏏?.. home ground.. what are the odds?

मागच्या वर्षी ODI WCWC जिंकलो, त्याबद्दल लिहायचं राहिलं.. म्हणून, आधी backlog भरून काढुया (अगदी थोडक्यात).. २०२३ सालचा जखमी शेर Australia 🇦🇺, आणि २०२५ चा जखमी भारत, ह्यात पुरुष आणि महिला संघ सोडले, तर खास तसा फरक नव्हता..


group stage मधून चौथ्या स्थानावर उपांत्य फेरीसाठी qualify होणं आणि त्यातून विश्वचषक जिंकून आणणं म्हणजे नुसतं कौतुकास्पद नव्हे तर कारगिल गर्ल 🚁 चलचित्रातल्या कौसर मुनीरच्या "है सारे जहाँ पे भारी, मेरे भारत की बेटी" मधल्या एकुणएक शब्दाला शोभण्यासारखं होतं.. as Siddhu also quotes (courtesy: TGIKS, Netflix),

मिथाली राज से लेकर
स्मृती और हरमनप्रीत तक भारत का असली नाज़ है औरत..
ये सीने में तूफान और रगों में बलिदान है,
ये जेमिमाह का जुनून है
और दीप्ति शर्मा के हुनर की पहचान है..
ये शबरी का इंतज़ार भी है,
और रानी लक्ष्मीबाई की जयजयकार भी है..
ये ज़िद है भीकाजी कामा की,
और ये शेफाली वर्मा की विजय ललकार भी है..
ये हमारा गहना है, ये हमारी सच्ची दौलत है..
ये आजके gentlemen's cricket game के सर की ताज है..
जब भी भारतीय cricket का इतिहास लिखा जाएगा,
हरियाणा hurricane कपिल देव, captian cool MS Dhoni और पंजाब की power girl हरमनप्रीत का नाम आएगा..

back to 2026,

२०११ साली भारताने जी प्रथा मोडली, त्याची यंदा पुनरावृत्ती होईल का?.. जसा दहावा ODI MCWC 🇮🇳 भारताने भारतात जिंकला, तसाच हा दहावा T20I MCWC भारत भारतात जिंकेल का?.. आधीच्या ९ पैकी कुठलाच चषक 🏆 यजमान देशाने जिंकला नव्हता (ODI) / अद्याप जिंकलेला नाही (T20I).. धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकाराने 'यजमान देश जिंकत नाही' हा समज मोडीत काढला होता.. असंच काहीतरी सुर्या करेल का?..

ह्यात तर्क शोधण्यापेक्षा परंपरेला मोडण्याची जिद्द महत्त्वाची होय 😊.. कारण सरतेशेवटी 'उम्मीद पे दुनिया कायम है'.. तसंही भीती आणि आशा दोन्हीही दिसत नाही - त्यामुळे कशावर जास्त विश्वास ठेवायचा, हे फक्त आपल्यावर असतं..

कुठेतरी बघितलं / ऐकलं असेलच की २००७ साली ZIM 🇿🇼 ने AUS ला हरवलं होतं.. भारत super 8 मधला पहिला सामना हारला होता.. ह्यावर्षीही same pattern repeat होत असतांना दिसत आहे.. आज इतिहासाची ही चक्रे ☸️ पुन्हा त्याच जागी येऊन थांबली आहेत, जिथून T20I विश्वचषक आणि भारताच्या विश्वविजेतेपदाचा प्रवास सोबत सुरू झाला होता 🏅.. योगायोग म्हणायचे की नियती?.. शेवटी 'history repeats itself' नावाचाही काही प्रकार असतोच की..

अपनी गली में कुत्ता भी शेर होता है.. home ground

खेळपट्टी आणि प्रेक्षकांचा आवाज हे एखाद्या ब्रह्मास्त्रासारखं नक्कीच काम करतात.. पण जेव्हा परके संघ दुसऱ्यांच्या अंगणात जाऊन डरकाळी फोडतात, तेव्हा home groundचा दबाव आपल्यावरच उलटतो का? 🙄..

a bit off-track.. trekला गेलो असता, बहुतेक वेळेस एखादा कुत्रा 🐕 असतो सोबत.. एकटे असाल वाटेवर, तर ह्याची शक्यता जास्त.. such noble souls - शोधून सापडणार नाहीत.. मग हे जेव्हा trek करत-करत (सोबत चालत-चालत) दुसऱ्यांच्या territoryत शिरतात, तेव्हा सुरू होतो कल्लोळ.. नेमकी हीच परिस्थिती एखाद्या 'away series' मध्ये असते.. तुम्ही कितीही ताकदवान असा, पण समोरच्याचा गड सर करताना स्थानिक 'शेरां'चा सामना करावाच लागतो.. आपल्या सोबत आलेला बिचारा कसातरी त्या शेरांपासून धडपड करत जीव वाचवत असतो.. सर्वच बाबतीत हे बहुदा बघायला भेटतं..

२०१३ ची champions league आठवते तुम्हाला?.. तुम्ही म्हणाल cricketच्या article मध्ये football ⚽ कुठून आला !!.. not really.. cricketची champions league - असं पण काही असतं का?.. हो, २०१४ पासून काही कारणाने बंद झाली, पण त्याआधी व्हायची.. परत चालू करत आहेत, असं ऐकलंय, we'll see.. back to २०१३.. Rajasthan Royalsने सर्व सामने जिंकले, फक्त अंतिम फेरी हारायला.. का?.. तर म्हणे, सामना Jaipurला नव्हता..

२०१५ ODI MCWC तर नक्कीच आठवत असेल.. exact same pattern आपण बघितला NZ 🇳🇿 सोबत.. सर्व सामने मायदेशी खेळून जिंकले आणि final Melbourneला जाऊन हारले 😵.. थोडक्यात काय?, तर परिस्थिती बदलली की नशिबाचे फासेही उलटे पडतात.. put differently, आपल्या बालेकिल्ल्याच्या बाहेर पाऊल टाकताच मोठमोठ्यांचे 'किल्ले' ढासळतात..

पण मग, अशी काही परिस्थिती ह्या finalची तर नाही 🤔.. सामना तर भारतातच आहे.. एक भारतीय म्हणून तुमच्या आशा वाढल्या असतील तर चला थोडी भीती सुद्धा घालतो..

तर आठवा - eighth नाही remember.. तर आठवा तो दिवस आणि ती रात्र.. आठवा Cummins काय म्हणाला होता - nothing more satisfying than hearing a big crowd go silent 😶.. २०२३ च्या चषकात भारत एकुलता सामना जो हारला तो ह्याच मैदानावर 🏟️.. आणि नुकताच SA विरुद्ध जो एकुलता सामना ह्या चषकातला हारला, तो सुद्धा इथेच.. जखमी शेर आणि गली का कुत्ता सारखे हे दोन्ही संघ जे बरसले, त्याचं भारताकडे काही उत्तर नव्हतं.. आता तुम्ही म्हणाल, जखमी शेर ठीक आहे, पण SA 🇿🇦 आणि गली का कुत्ता काय गणित आहे?.. थोडक्यात, आठवा - remember नाही eighth 🎱.. आठवा सामना कोलकात्याला हारण्या आधी, ते इथे ५ सामने खेळले होते, so गली का कुत्ता..

मैदानाचं नाव बदलल्या पासून, हे दोन्ही सोडून इतर कुठले सामने भले भारताने इथे हारले नसतील (एक कसोटी सामना अनिर्णित होता), पण २०२३ चा गमावला, त्याने सब किये पे पानी फेर दिया 😭.. after all, "all that glitters is only gold".. इससे और भी कुछ याद आया.. यंदा परत (२०२४ सारखंच), Ind एकदा all out झाली आहे, NZ अजून नाही.. more details on both these topics in earlier ODI and T20I MCWC articles.. शेवटी links दिल्या आहेत..

त्यात रोहित शर्मा म्हणतोय, repeat तर करूच, सोबत history defeat सुद्धा करू.. तिसऱ्यांदा, लागोपाठ आणि यजमान - तीन प्रकारे never before achievements in T20I MCWC.. रोहितच्या 'hitman' जिद्दीसमोर इतिहासही नतमस्तक होईल अशी आशा आहे.. एका तऱ्हेने त्या दिशेने वाटचाल चालू दिसते तर आहे.. २०१२ चा 🇱🇰 SL सोडला तर इतर कुठलाच संघ, अजून अंतिम फेरी जिंकणे सोडा, अंतिम फेरीत पोहोचला सुद्धा नाही आहे.. घरच्या मैदानावर अंतिम फेरी गाठणारा भारत हा केवळ दुसराच संघ ठरला आहे.. defeat करायला हे सुद्धा एक आव्हान होतंच, ज्यात भारताला यश आलं आहे..

अजून एक महत्वाचं सांगायचं झालं तर.. भारताचा सर्वाधिक धावांनी T20I सामना जिंकायचा विक्रम, ह्याच मैदानावर आहे.. समोर कुठला संघ होता?, ह्याचा कदाचित तुम्ही अंदाज लावला असावा.. तब्बल १६८ धावांचा फरक.. खूप जुनी गोष्ट नाही आणि NZचा संघही २-३ जणांच्या फरकाने साधारण तोच - १ फेब्रुवारी २०२३.. अब तो खुश हो जाओ 😃..

तरी, "कोण जिंकेल?" ह्याचं उत्तर इथे काहीजरी आणि कितीजरी लिहिलं तरी सामना झाल्याशिवाय मिळणार नाही आहे.. आपल्याला भीती आणि आशा जरी दिसत नसल्या तरी रोहित म्हणतो तसा, मैदानावर उतरल्यावर आपल्या खेळाडूंना दिसतो तो फक्त तिरंगा 🇮🇳.. सर्वाधिक अनिश्चितता असलेल्या ह्या खेळात 🏏, जिथे कागदावरचे आकडे मैदानावरील गाळलेल्या घामाने पुसले जातात, एवढं तर नक्की आहे - उपांत्य फेरी एवढी चुरशीची झाल्यामुळे अंतिम फेरी 'पानी कम चाय' होणार आहे.. अभिषेक आणि वरुण नक्की चालतील (खेळवलं तर) २०२४ च्या कोहली सारखं.. तसंच रवींद्रची फळी सुद्धा..

home ground चा फायदा कुठल्या संघाला मिळेल, सांगणं अवघड आहे, कारण दोन्ही संघ SA विरुद्ध हारले होते, ज्यात भारताची कामगिरी NZ पेक्षा जरा अधिकच गरीब होती.. म्हणून, home ground ब्रह्मास्त्र म्हणून काम करेल की दडपण, सांगणं सद्यपरिस्थितीत अवघड आहे..

पण जर भारत इथे पुन्हा हारला, तर मात्र ह्या मैदानाचं नाव पुन्हा 🗿 Ironman ठेवण्यात यावं, ही सदिच्छा.. कारण इथे अंतिम सामन्यापर्यंत टिकण्यासाठी आणि अंतिम सामन्यात जिंकण्यासाठी पोलादी जिद्दच हवी..

annexure

ODI MCWC 2023,

T20I MCWC 2024,

Tuesday, 30 September 2025

मुलगी शिकली, प्रगती झाली

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

शारदीय नवरात्र म्हणून तुम्हाला कदाचित "नवसकाळी" article अपेक्षित असावं.. येईल तेही काही दिवसात.. पण आजचा color 'pink' म्हणून अधोलिखित.. तसंही बरेच दिवस, महिने, कदाचित वर्ष झालं असेल, ह्या विषयावर लिहायचं होतं..

मुलगी शिकली, प्रगती झाली.. तुम्हाला काय वाटतं?

(not to be confused with and not to be misinterpreted as 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ')

बऱ्याच लोकांचा जिवाभावाचा विषय.. असून नसल्यासारखा.. नसून असल्यासारखा.. ह्या विषयाशी निगडित अस्तित्वात असलेलं, नसलेलं सगळं मान्य आहे, फक्त एक नजर पडद्याआड टाकूया आणि विषय समजण्यासाठी जरा खोलात जाऊया, or, from a different perspective..

feminism

सध्या खूप गाजलंय.. आणि हा गाजावाजा थांबेल किंवा संपेल, असं काहीही दिसत नाही.. coronaचाही असाच भास झाला होता.. पण मग कसं ! तो जागतिक विषय होता ना.. किती दिवस सहन करणार? कुठून तरी, कोणी तरी त्याच्यावर उपाय शोधणार, हे नक्की होतच.. feminismचं तसं नाही आहे - अगदी रामायण, महाभारतच्या काळापासून हा विषय अस्तित्वात आहे.. गेल्या काही वर्षात फक्त ह्याचं बारसं झालंय, rather प्रसिद्धी मिळाली आहे..

तर - exactly काय प्रकरण आहे "feminism".. एक AI सांगतो - The belief in and advocacy of the social, economic, and political equality of the sexes.. दुसरा आणि तिसरा AI सुद्धा थोड्याफार फरकाने तेच सांगतात - Feminism is the belief in gender equality, especially advocating for women's rights..

आणि - आपण ह्याला काय समजून, कश्यातऱ्हेने गैरवापर करतो, हे वेगळं सांगायला नको.. exactly सांगायचं झालं तर, main मुद्दा "equality" आहे, नुसतं "women" नव्हे - ह्याच्याकडे आपण अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो..

साधारण ह्याच विषयाशी निगडित - पितृसत्ता (patriarchy) आणि मातृसत्ता (matriarchy) ह्या दोन्ही मध्ये, कुठली व्यवस्था चांगली आहे, हे ठरवणं तितकंच सोपं अवघड, जितकं 'मोदी की गांधी?' हे ठरवणं.. असो, भावना पोहचवणे महत्वाचं होतं.. तरी.. "सीतेमुळे रामायण आणि द्रौपदीमुळे महाभारत घडलं" ह्या विचारांचा मी अजिबात नाही.. आणि कृपया, ह्याचा दुसरा कुठला अर्थ काढून, इतर कोणाला दोषी मानू नये, कारण मुळात दोष कधी कोणाचा नसतोच.. back to article..

आई

आपण सगळेजण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक भूमिका पार पाडतो.. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला असंख्य गोष्टी शिकायला मिळतात आणि याच प्रवासात आपलं व्यक्तिमत्त्व आकार घेतं.. ह्या सगळ्यांत एक महत्त्वाचा role असतो, तो आईचा..

अपत्याचे संगोपन करतांना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात घेऊन, neglect नाहीच केल्या गेल्या पाहिजे, ज्या म्हणजे - आपण जे करतोय त्याने अपत्याचे भविष्य कसे घडेल आणि आपण जे करतो आहे, त्याला एखादी सामाजिक प्रतिक्रिया असू शकेल का?.. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, थोड्याफार फरकाने आपल्या सगळ्यांचे आयुष्य सारखंच आहे म्हणून काहीही नवीन किंवा वेगळं करण्याअगोदर 'शायद लोग कुछ कहेंगे' चा दरवाजा आपण चुकून ठोठावत तर नाही ना, हा सुद्धा विचार केला गेला पाहिजे..

Going by some of the famous sayings, 
Loosen up. Relax. Except for rare life-and-death matters, nothing is as important as it first seems.
Children are great imitators. So give them something great to imitate.

दोन्ही जुळवून अर्थ काढायचा झाला तर - फालतू गोष्टींमागे वेळ वाया न घालवता, प्रस्थापित गोष्टींवर focus करून / follow करत अपत्यासाठी आदर्श बनून आई-वडलांनी त्यांचं आयुष्य घडवायला हवं, ज्याणेंकरून भविष्यात जेव्हा कधी ते आई / वडील बनतील, त्यांना चांगला head-start भेटेल.. उन्नीस-बीसच्या फरकाने कशाला 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'च्या नादी लागून स्वतःची खोटी समजूत काढायची वेळ हुन ओढून घ्यायची?..

अर्धांगिनी

आईपेक्षाही अजून महत्वाचा role असतो, तो म्हणजे अर्धांगिनीचा.. कृपया लक्षात घ्या, अगदी जाणीवपूर्वक "गृहिणी" शब्द वापरला नाही आहे..
अर्धांगिनी - अक्षरशः अर्थ 'शरीराचा अर्धा भाग'.. म्हणजे, 'sharing and caring' हे life long अविभाज्य घटक.. इथे TTMM हा विषय कधी नसतोच / नसायलाच हवा.. अजून काय म्हणायचं आहे, हे लक्षात आलं असावंच.. नसेल आलं, तर इथे काहीजरी लिहिलं तरी ह्याचा अर्थ अजून समजून घेण्याइतपत तुमचे विचार बदलतील, हे शक्य नाही.. म्हणून, next topic..

अहंकार - and its applicability

तसा ह्याचा आणि articleचा खास किंवा direct संबंध नाही.. but, it. is. important..
थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या सर्वच गोष्टी चांगल्या असतात.. पण मग, वयाने मोठं असल्याचा धाक किंवा अजून योग्य शब्द वापरायचा झाला तर, "अहं" दाखवून नुसते स्वतःचे विचार मांडत, समोरच्याला कवडीच्या भावात मोलने - तुम्हाला बरोबर वाटत असल्यास नक्की कळवणे.. ह्यात काही senior citizens तर इतके पटाईत आहेत की ह्यांना सामाजिक व्यवस्थेशी काहीही घेणंदेणं नसतं.. जे की exactly उलट असायला हवं.. 

on the same "अहंकार" topic and also going back to "अर्धांगिनी" - 'आपल्याला गरज किती आणि ताळमेळ कसा बसवायचा?' ह्याचा विचार प्रत्येक अर्धांगिनीतल्या त्या 'गृहिणी'ने नक्कीच करायला हवा.. कृपया लक्षात घ्या, इथे मात्र अगदी जाणीवपूर्वक "गृहिणी" हा शब्द वापरला आहे.. and again, ह्याचा अर्थ पुन्हा हा काढणंही चुकीचं ठरेल की, 'एखाद्याला अहंकार अगदी नसावाच' किंवा 'पितृसत्ता सर्वश्रेष्ठ किंवा श्रेष्ठ आहे'..

having said all of this, 
please you too think a bit about it, कारण थोड्याफार फरकाने आपल्या सगळ्यांचे आयुष्य सारखंच आहे..
 
तुम्हाला काय वाटतं?
मुलगी शिकली.. पुरेसं आहे का? कश्याच्या बदल्यात? 
आणि ह्यासाठी आपण काय मागे टाकतो आहे?
प्रगती झाली.. कोणाची? कश्याच्या बदल्यात? 
आणि ह्यासाठी आपण काय किंमत मोजतो आहे?

Monday, 23 June 2025

वारी

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

आपल्या मूळ वृत्तीपासून ‘निवृत्ती’ घेऊन ‘ज्ञाना’च्या ‘सोपाना’ने ‘मुक्ती’ कडे केलेली वाटचाल.. वारी

प्रयोजन

वेढा वेढा रे पंढरी ।
मोर्चे लावा भीमा तीरी ।।

तुम्ही पंढरीला वेढा घाला.. चंद्रभागेच्या तीरावर मोर्चेबांधणी करा.. विठ्ठलाला आत कोंडून टाका.. आणि, त्याच्याकडून प्रेमरूपी खंडणी वसूल करा.. that's one of the many possible ways of looking at it..


आवृत्त्या

दिंडी स्वरूपातील वारीची परंपरा ज्ञानेश्‍वर - नामदेवांच्याही अगोदरपासूनची आहे..

हिला पालखीची जोड द्यायचे श्रेय तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांना जाते.. नारायणबाबांना स्फूर्ती झाली की आपण प्रतिवर्षी दिंडी घेऊन पंढरीची वारी करतो.. त्याला तडका लावत, ज्ञानोबा - तुकोबांच्या बरोबर का करू नये? 🤔.. हे संत जरी देहरूपाने आपल्या समवेत नसले, तरी प्रतीकात्मकरीत्या आणि नामरूपाने असू शकतात.. मग त्यांची पालखी सज्ज करून तिच्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली.. ही पालखी मिरवीत ते आळंदीला गेले.. तेथे त्याच पालखीत ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या आणि तिथून निघाले / नियमित निघायला लागले एकत्र पंढरपूरला..

पालखी drivers

१८३२ दरम्यान देहू देवस्थानाचे मालक असलेल्या तुकोबांच्या वारसदारांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली.. तिचा परिणाम वारीवर होण्याची शक्‍यता बघून काही सूज्ञ मंडळींनी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचा सोहळा आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरवात केली.. आणि इथून सुरू झाली दोन वेगळ्या वाटेंनी पंढरपूर सर करण्याची परंपरा..


अनुशासन

who else than 'शूर आम्ही सरदार'?.. शिस्त म्हटलं की military cut से बेहतर कौन?.. हैबतराव आरफळकर.. त्यांनी पालखी सोहळा शिस्तबद्ध आणि अधिक व्यवस्थित केला.. उठ म्हटलं की उठणार, झोप म्हटलं की.. .. 🎪

हे सुधारित, सोयीस्कर version पाहून, त्याला अजून customize करत पुढे इतरही संतांच्या पालख्या त्यांच्या - त्यांच्या गावांमधून निघू लागल्या.. सर्वांचे मुक्काम पोस्ट - पंढरपूर 📨..

अवघा रंग एकचि झाला

सामूहिक सोहळा

जप, तप, ध्यान, धारणा या साधना वैयक्तिक आहेत.. वारी ही गोष्ट अनेकांनी मिळून करायची आहे.. (इतर सणांसारखच) पंढरपूरला जायचे ते एकट्याने नव्हे आणि गूपचूपही नव्हे.. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत 🪕 🪘..

एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।
..असा हा मामला आहे

म्हणून तर तुकाराम महाराज सर्वांनाच आवाहन करतात,
स्वल्प वाटे चला जाऊ। वाचे गाऊ विठ्ठल।।
तुम्ही आम्ही खेळीमेळी। गदारोळी आनंदे।।
..ह्या आवाहनातील खेळीमेळी, गदारोळी, आनंदे हे शब्द लक्षणीय आहेत 🕺.. कारण, वैयक्तिक पद्धतीने साधना करणाऱ्या साधकांना हे शब्दप्रयोग शक्य नाहीत..


मनुष्य जन्माचा महोत्सव किंवा celebration

किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा?.. ह्या प्रश्नाला ⁉️ तुकाराम महाराजांनी फार छान उत्तर दिले आहे.. नितिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई-वडिलांची काळजी घेता यावी, अब्रुने जगता यावे, आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा, मन मोकळ्या पणाने गप्पा मारता याव्यात - इतका पैसा जवळ असला कि तो माणूस खूप श्रीमंत समजावा..

इथून पुढे जगण्याचं स्वरूप असावं, वारी

संतांना जन्माचा आणि देहाचा तिटकारा नाही..
तुका म्हणे आम्ही देह उपकारे।
गाऊ निरंतर नाचू लागो।।
..असे ते म्हणतात.. पण म्हणजे ते देहाला चिकटूनही बसत नाहीत.. शरीराला क्‍लेशही द्यायचे नाहीत व लाड करून भोगही द्यायचे नाहीत, हा त्यांचा मध्यम मार्ग आहे..

तुम्ही कुठे ते न दिसणारे आत्मा - परमात्मा घेऊन बसलात?.. आपण जी जगतोय ती मोहमाया नसून, ह्या न दिसणाऱ्या 👻 गोष्टीच मोहमाया म्हणायला हव्या, नाही का !?


यात्रा vs वारी

देशभरात "वारी" हा शब्द व ही संकल्पना फक्त वारकरी संप्रदायातच आढळते.. देशातील अन्य संप्रदायामध्ये 'यात्रा' असा धार्मिक शब्द आढळतो.. पण 'यात्रा' व 'वारी' ह्या शब्दांत आणि संकल्पनेंत जमीन-अस्मानाचा फरक आहे.. पंढरपूरची 'यात्रा' नाही 🚫..

असंख्य भाविक तिरुपतीला, काशीला, तसेच चार धाम दर्शनाला जातात.. त्याला वारी म्हणत नाहीत, तर 'तीर्थयात्रा' म्हणतात.. या 'यात्रा' भाविक स्वेच्छेने आणि स्वत:च्या सोईने केव्हाही व कधीही करतात आणि ठरावीक काळाने वारंवार करीत नाही.. पण पंढरीची वारी ही एकदाच करण्याची नसून सातत्याने, वारंवार, जन्मभर व पिढ्यानपिढ्या करण्याची साधना आहे 🥳..


परतवारी

वारी, आपणा सगळ्यांनाच माहित आहे.. मात्र 'परतवारी' माहित असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.. पालखी / पादुका एकदा पंढरपुरी पोहोचल्या, ठीक आहे, पण return journeyचं काय?.. त्यांना back to pavillion सुद्धा सुखरूप पोहोचावं / पोहोचवावं लागत असेलच ना?.. त्याच वाटेने, जायच्या निम्म्या कालावधीत परतणारी ⏳, 'परतवारी' सुद्धा एक प्रस्थापित परंपरा आहे..


प्रकार

वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते.. हे नमूद करावं, असं वाटायचं कारण म्हणजे गेल्या वर्षीच (२०२४) सुमेधच्या शाळेत ह्याचं एक नाटक झालं होतं..

अजून मग 🏃‍♂️ रनवारी, cycle वारी इ. प्रकार तुम्ही ऐकून असालच 🚴‍♂️..

२२ जून २०२५
स्वारगेट ते सासवड





कीर्तन, भजन, भारूड, गवळण, प्रवचन, मनोरा, रिंगण, फुगडी इत्यादी माध्यमातून संगीत, गायन, खेळ, अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ असणारा पालखी सोहळा ही वाचण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे.. पण.. but.. किन्तु.. आज हैबतराव हयात नाहीत.. बाकी,

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम |
पंढरीनाथ महाराज की.. जय !!

विषय खूप मोठा आहे, आणि वाचावं / बघावं तेव्हढी नवीन / वेगळी माहिती मिळेल.. त्यामुळे ह्यात बऱ्याच बाबी चुकीच्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. at the end, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी 🙇‍♂️..

Sunday, 1 June 2025

Doodles

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

walking the line.. doodles

disclaimer: by definition, a doodle means "scribble absent-mindedly".. while all of below needs attention to detail, yet, the article is titled "doodles" for no, yet many reasons..

the way Indian cities are planned, most of you will agree, rather all of you must agree that it's not easy to create an art here.. but 💭, what has planning of cities to do with any art form.. let me take that..

urban contours as an art form (slightly bonkers)

imagine your daily walking 🚶‍♂️ not just as exercise, but as an act of pure, unadulterated artistic genius.. what if your very own footsteps could become the lines of an intricate drawing, etched onto the digital canvas? 💡.. yes, when contour drawing with a pen, in itself is not easy, doing it with your legs, without lifting the metaphorical pen, is another beast entirely.. you'd be surprised, how tricky it is to "draw" a 6-pointed star, but 5 or 7 pointers are walk in the park..

doodle #10, 5-pointed star ⭐

the whole of phenomenon transforms urban landscapes and open grounds into dynamic canvases, and our movement is nothing less than painting a masterpiece.. the same sweaty, huffing, sometimes-dodging-a-scooter movement can very much put that missing cherry on your cake 🍰..

doodle #24, छावा 🚩

the core principle is wonderfully simple, if not a little off-the-wall - analogous to an artist rendering the outline of an object without lifting his pen from the paper, the objective here is toward completing a recognizable form through continuous locomotion 👣 tracked over a GPS signal.. it's a performance art, but with more steps and less critical acclaim, unless handful of kudos are something to account for..

doodle #1, जिरेटोप 

the urban canvas - shapes in motion (and occasional panic)

the possibilities for shapes are as endless as one's ☕ caffeine-fueled imagination (or चाय)..

a pyramid 🔺, with its sharp angles and defined edges, demanding the precision of a Swiss watchmaker..

doodle #16, pyramid

a 6-pointed star ⭐ and a cube inside a triangle - with their interlocking lines, required careful planning and execution.. messing up with a point led to some manipulations - no point in throwing away the entire canvas for those silly ones..

doodle #12, a 6-pointed star

doodle #4, 3D ◼️ inside 2D 🔺

a paper plane ✈️, soaring (or, more likely, meandering) across the map, evoking a sense of freedom..

doodle #3, paper plane #1

doodle #6, paper plane #2 🛩️

crafting a "G+D" logo on its anniversary 🎈 adding a bespoke touch..

doodle #25, G+D logo

and for the intrepid 🔮 Harry Potter fan, a frustrating endeavour into never making, but just attempting the perfect circle from the deathly hallows symbol on an open ground or otherwise.. those perfectly round shapes can be deceptively difficult to maintain with a GPS signal and two feet.. less of an "Elder Wand" 🪄 and more of an "Elder Wobble"..

doodle #22, deathly hallows #2

our national flag 🇮🇳, with its iconic tricolor and Ashoka chakra, presenting a truly rewarding challenge, needed meticulous movement to capture its distinct features..

doodle #21, स्वदेस

doodle #21, 🇮🇳

Strava - the artistic medium (and alibi)

the popular most social platform for fitness enthusiasts, helping also as the digital sketchbook.. the "no lifting the pen" rule translates to continuous recording of the activity.. however, the real world is rarely as accommodating as a blank sheet of paper.. that's where strategic pauses and restarts ⏯️ come into play - a secret weapon against architectural insolence.. Potter fans will immediately relate to it as "teleporting"..

a particularly strange kind of art, blending geometry and improvisation, only because Google Maps can play a prankster and lies white about existence of a path 😢.. when a desired straight line is obstructed by uninvited plot twists - a building, a fence, or an unnavigable terrain, say, a particularly aggressive street vendor, the activity is simply paused.. then, it's required to relocate selves to the point where the line would logically continue, and then, the activity is resumed..

doodle #17, I'mpossible Triangle 📐

using the shortcoming of the App, where it is known at draw straight lines, for a lost GPS signal, unconventionally serves as a blessing in disguise 🥸.. using to the advantage, clean and unbroken lines even when physical obstacles dictate a detour, suddenly start resonating with the reality.. isn't this equivalent of an artist carefully repositioning his hand for / on the canvas?.. only here, the canvas is literally "the Earth" and the hand is "our entire body"..

yet in some cases, when the above is realized as impossible, we can do nothing more than accepting the hard reality of this doodling being inherently dynamic, subjected to the unpredictable nature of the environment, subtly altering the intended shape.. an unforeseen construction site might force a deviation or a sudden encounter with barking dogs 🐕 might lead to a point of a no return.. these "imperfections" are the unique signatures of a lived creation, adding the layer of authenticity that any cloning activity is always a bit more chaotic than how it sounds like, during take 1..

doodle #13, Sinhgad ⛰️

doodle #19, Sinhgad ⛰️ #2

another challenge is arguing with a compass 🧭 that has commitment issues.. standing at the same point at two different intervals is a punishable offence.. the satellites just refuse to overlap the earlier signal..

if not attentive enough, one minute you're headed north, the next minute, you're off 90° because you blinked and took a wrong turn 🤦‍♂️ on कुमठेकर road..

doodle #2, पुणे

beyond the shape - the art of the journey (and the sore calves)

despite all the detours, barking interruptions, and GPS hiccups, there’s a joy in looking at the final route and thinking, "Yep, that’s almost a pyramid!" 😇 It’s not about perfection - it’s about play.. and patience.. along with encountering strange looks, "why you need to walk with so much of screen time?"..

it’s walking with intention.. drawing with motion.. failing creatively, and often.. above all, every completed shape is not just a drawing, but also a sweaty epic of GPS co-ordinates - a tangible, undeniable record of the performance..

doodle #25, कर्मभूमी

so, here’s to walking artfully.. to pausing like a sneaky magician, and resuming it as if nothing happened.. to zigzagging through life with a shape in mind and reality underfoot.. and to every squiggly line that wasn’t meant to be - but somehow, still is 😎..

when you find youself walking next, consider the artistic potential.. choose a shape, and start tracing its lines.. you might just discover a whole new way to see and interact with the world around you..

some legends from this field,




Duncan's 🙇‍♂️ out of the box 🫡

Doodles 3

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे.. Doodles 3 काही दिवसांपासून माझं 'work from home'चं स्वरूप पुन्हा एकदा ...