Skip to main content

वारी

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

आपल्या मूळ वृत्तीपासून ‘निवृत्ती’ घेऊन ‘ज्ञाना’च्या ‘सोपाना’ने ‘मुक्ती’ कडे केलेली वाटचाल.. वारी

प्रयोजन

वेढा वेढा रे पंढरी ।
मोर्चे लावा भीमा तीरी ।।

तुम्ही पंढरीला वेढा घाला.. चंद्रभागेच्या तीरावर मोर्चेबांधणी करा.. विठ्ठलाला आत कोंडून टाका.. आणि, त्याच्याकडून प्रेमरूपी खंडणी वसूल करा.. that's one of the many possible ways of looking at it..


आवृत्त्या

दिंडी स्वरूपातील वारीची परंपरा ज्ञानेश्‍वर - नामदेवांच्याही अगोदरपासूनची आहे..

हिला पालखीची जोड द्यायचे श्रेय तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांना जाते.. नारायणबाबांना स्फूर्ती झाली की आपण प्रतिवर्षी दिंडी घेऊन पंढरीची वारी करतो.. त्याला तडका लावत, ज्ञानोबा - तुकोबांच्या बरोबर का करू नये? 🤔.. हे संत जरी देहरूपाने आपल्या समवेत नसले, तरी प्रतीकात्मकरीत्या आणि नामरूपाने असू शकतात.. मग त्यांची पालखी सज्ज करून तिच्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली.. ही पालखी मिरवीत ते आळंदीला गेले.. तेथे त्याच पालखीत ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या आणि तिथून निघाले / नियमित निघायला लागले एकत्र पंढरपूरला..

पालखी drivers

१८३२ दरम्यान देहू देवस्थानाचे मालक असलेल्या तुकोबांच्या वारसदारांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली.. तिचा परिणाम वारीवर होण्याची शक्‍यता बघून काही सूज्ञ मंडळींनी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचा सोहळा आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरवात केली.. आणि इथून सुरू झाली दोन वेगळ्या वाटेंनी पंढरपूर सर करण्याची परंपरा..


अनुशासन

who else than 'शूर आम्ही सरदार'?.. शिस्त म्हटलं की military cut से बेहतर कौन?.. हैबतराव आरफळकर.. त्यांनी पालखी सोहळा शिस्तबद्ध आणि अधिक व्यवस्थित केला.. उठ म्हटलं की उठणार, झोप म्हटलं की.. .. 🎪

हे सुधारित, सोयीस्कर version पाहून, त्याला अजून customize करत पुढे इतरही संतांच्या पालख्या त्यांच्या - त्यांच्या गावांमधून निघू लागल्या.. सर्वांचे मुक्काम पोस्ट - पंढरपूर 📨..

अवघा रंग एकचि झाला

सामूहिक सोहळा

जप, तप, ध्यान, धारणा या साधना वैयक्तिक आहेत.. वारी ही गोष्ट अनेकांनी मिळून करायची आहे.. (इतर सणांसारखच) पंढरपूरला जायचे ते एकट्याने नव्हे आणि गूपचूपही नव्हे.. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत 🪕 🪘..

एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।
..असा हा मामला आहे

म्हणून तर तुकाराम महाराज सर्वांनाच आवाहन करतात,
स्वल्प वाटे चला जाऊ। वाचे गाऊ विठ्ठल।।
तुम्ही आम्ही खेळीमेळी। गदारोळी आनंदे।।
..ह्या आवाहनातील खेळीमेळी, गदारोळी, आनंदे हे शब्द लक्षणीय आहेत 🕺.. कारण, वैयक्तिक पद्धतीने साधना करणाऱ्या साधकांना हे शब्दप्रयोग शक्य नाहीत..


मनुष्य जन्माचा महोत्सव किंवा celebration

किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा?.. ह्या प्रश्नाला ⁉️ तुकाराम महाराजांनी फार छान उत्तर दिले आहे.. नितिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई-वडिलांची काळजी घेता यावी, अब्रुने जगता यावे, आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा, मन मोकळ्या पणाने गप्पा मारता याव्यात - इतका पैसा जवळ असला कि तो माणूस खूप श्रीमंत समजावा..

इथून पुढे जगण्याचं स्वरूप असावं, वारी

संतांना जन्माचा आणि देहाचा तिटकारा नाही..
तुका म्हणे आम्ही देह उपकारे।
गाऊ निरंतर नाचू लागो।।
..असे ते म्हणतात.. पण म्हणजे ते देहाला चिकटूनही बसत नाहीत.. शरीराला क्‍लेशही द्यायचे नाहीत व लाड करून भोगही द्यायचे नाहीत, हा त्यांचा मध्यम मार्ग आहे..

तुम्ही कुठे ते न दिसणारे आत्मा - परमात्मा घेऊन बसलात?.. आपण जी जगतोय ती मोहमाया नसून, ह्या न दिसणाऱ्या 👻 गोष्टीच मोहमाया म्हणायला हव्या, नाही का !?


यात्रा vs वारी

देशभरात "वारी" हा शब्द व ही संकल्पना फक्त वारकरी संप्रदायातच आढळते.. देशातील अन्य संप्रदायामध्ये 'यात्रा' असा धार्मिक शब्द आढळतो.. पण 'यात्रा' व 'वारी' ह्या शब्दांत आणि संकल्पनेंत जमीन-अस्मानाचा फरक आहे.. पंढरपूरची 'यात्रा' नाही 🚫..

असंख्य भाविक तिरुपतीला, काशीला, तसेच चार धाम दर्शनाला जातात.. त्याला वारी म्हणत नाहीत, तर 'तीर्थयात्रा' म्हणतात.. या 'यात्रा' भाविक स्वेच्छेने आणि स्वत:च्या सोईने केव्हाही व कधीही करतात आणि ठरावीक काळाने वारंवार करीत नाही.. पण पंढरीची वारी ही एकदाच करण्याची नसून सातत्याने, वारंवार, जन्मभर व पिढ्यानपिढ्या करण्याची साधना आहे 🥳..


परतवारी

वारी, आपणा सगळ्यांनाच माहित आहे.. मात्र 'परतवारी' माहित असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.. पालखी / पादुका एकदा पंढरपुरी पोहोचल्या, ठीक आहे, पण return journeyचं काय?.. त्यांना back to pavillion सुद्धा सुखरूप पोहोचावं / पोहोचवावं लागत असेलच ना?.. त्याच वाटेने, जायच्या निम्म्या कालावधीत परतणारी ⏳, 'परतवारी' सुद्धा एक प्रस्थापित परंपरा आहे..


प्रकार

वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते.. हे नमूद करावं, असं वाटायचं कारण म्हणजे गेल्या वर्षीच (२०२४) सुमेधच्या शाळेत ह्याचं एक नाटक झालं होतं..

अजून मग 🏃‍♂️ रनवारी, cycle वारी इ. प्रकार तुम्ही ऐकून असालच 🚴‍♂️..

२२ जून २०२५
स्वारगेट ते सासवड





कीर्तन, भजन, भारूड, गवळण, प्रवचन, मनोरा, रिंगण, फुगडी इत्यादी माध्यमातून संगीत, गायन, खेळ, अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ असणारा पालखी सोहळा ही वाचण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे.. पण.. but.. किन्तु.. आज हैबतराव हयात नाहीत.. बाकी,

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम |
पंढरीनाथ महाराज की.. जय !!

विषय खूप मोठा आहे, आणि वाचावं / बघावं तेव्हढी नवीन / वेगळी माहिती मिळेल.. त्यामुळे ह्यात बऱ्याच बाबी चुकीच्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. at the end, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी 🙇‍♂️..

Comments

  1. आपल्या मूळ वृत्तीपासून ‘निवृत्ती’ घेऊन ‘ज्ञाना’च्या ‘सोपाना’ने ‘मुक्ती’ कडे केलेली वाटचाल.. वारी
    Nice article ....memorable title ...!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

home ground

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। उद्या भारत 🇮🇳 जिंकेल का 🏏?.. home ground .. what are the odds? मागच्या वर्षी ODI WCWC जिंकलो, त्याबद्दल लिहायचं राहिलं.. म्हणून, आधी backlog भरून काढुया (अगदी थोडक्यात).. २०२३ सालचा जखमी शेर Australia 🇦🇺, आणि २०२५ चा जखमी भारत, ह्यात पुरुष आणि महिला संघ सोडले, तर खास तसा फरक नव्हता.. group stage मधून चौथ्या स्थानावर उपांत्य फेरीसाठी qualify होणं आणि त्यातून विश्वचषक जिंकून आणणं म्हणजे नुसतं कौतुकास्पद नव्हे तर कारगिल गर्ल 🚁 चलचित्रातल्या कौसर मुनीरच्या "है सारे जहाँ पे भारी, मेरे भारत की बेटी" मधल्या एकुणएक शब्दाला शोभण्यासारखं होतं.. as Siddhu also quotes (courtesy: TGIKS, Netflix), मिथाली राज से लेकर स्मृती और हरमनप्रीत तक भारत का असली नाज़ है औरत.. ये सीने में तूफान और रगों में बलिदान है, ये जेमिमाह का जुनून है और दीप्ति शर्मा के हुनर की पहचान है.. ये शबरी का इंतज़ार भी है, और रानी लक्ष्मीबाई की जयजयकार भी है.. ये ज़िद है भीकाजी कामा की, और ये शेफाली वर्मा की विजय ललकार भी है.. ये हमारा गहना है, ये हमारी सच्ची दौलत है.. ये आजके gentlemen...

Doodles

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। walking the line.. doodles disclaimer: by definition, a doodle means "scribble absent-mindedly".. while all of below needs attention to detail, yet, the article is titled "doodles" for no, yet many reasons.. the way Indian cities are planned, most of you will agree, rather all of you must agree that it's not easy to create an art here.. but 💭, what has planning of cities to do with any art form.. let me take that.. urban contours as an art form (slightly bonkers) imagine your daily walking 🚶‍♂️ not just as exercise, but as an act of pure, unadulterated artistic genius.. what if your very own footsteps could become the lines of an intricate drawing, etched onto the digital canvas? 💡.. yes, when contour drawing with a pen, in itself is not easy, doing it with your legs, without lifting the metaphorical pen, is another beast entirely.. you'd be surprised, how tricky it is to "draw" a 6-pointed star, but 5 or 7 pointer...