।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
एक विस्मरणीय अनुभव.. Special Gujrat with Yogesh Travels
नाही, typing mistake नाही आहे.. अविस्मरणीय नाही, मला "विस्मरणीय"च म्हणायचं आहे..
articleचा विषय "ગુજરાત" नव्हे..
पण चला, थोडं Yogesh Travels 🚌 बद्दल बोलूया..
train मध्ये बसायच्या अगोदरच ते आपल्या, TTEशी बोलून त्यांच्याकडील एक ticket 🎟️ cancel नाही करायला सांगणार.. trip book करतांना, मात्र असं काही सांगण्यात आलं नव्हतं, की तुम्हाला TTEचा 🧑✈️ शोध घेत trainच्या ३ चकरा माराव्या लागतील..
पहिल्या दिवशी (અમદાવાદ) hotelला गेल्यावर receptionला तासभर वाट ⏳ बघायला लावणार.. पहिल्या and शेवटच्या room allot होण्यात ३ तासांचं कुठे अंतर असतं व्हय?.. ह्यात travels चं / च्या management मध्ये किती गांभीर्य आहे, हे लक्षात येईलच 🤐..
अक्षरधामला exhibition 🖼️ आणि water show ⛲ चे 'मी ticket काढतो' म्हणून सांगणार, आणि bus मध्ये आल्यावर सगळ्यांकडून पैशे घेणार ₹१६०.. किती "double standards" 😑 म्हणावं !.. हेच मालकाला, म्हणजे बायकोच्या मामे भावाच्या बायकोला ♀️, सांगितल्यावर त्या सांगणार, 'सगळे tickets प्रवाशांकडे आहेत' 🤦.. तुम्हाला काय वाटतं, 'मुद्दा पैशांचा आहे का?' (आपण ह्या विषयावर परत बोलणार आहोत)..
वर अजून देखावा - माफी मागत म्हणणार, 'काय जे matter आहे, ते tour managerशी sort-out करा' 😖.. म्हणजे, ज्याला डोकं नाही, त्याच्याशी मी डोकं लावायचं..
रात्री जेवणाला चक्क पाण्याच्या बाटल्या नाही देणार.. promise केलेली 'प्रत्येकी एक' बाटली मागितल्यावर म्हणायचं, 'संपल्या'.. wtf ⁉️
सकाळी नाश्त्याला (on the way to સિધ્ધપુર / માતૃગયા) ५ बाटल्या (आई, आबा, मी, वसुधा, सुमेध) मागितल्यावर म्हणणार, ४च घ्या 😵💫.. म्हणजे ह्यांचे पोरं पाणी पीत नाहीत.. आणि, आधी जे ह्यांनी ऐकवलं, 'सुमेधला काही कमी पडू देणार नाही', ते म्हणजे लगेच पलटी, 'पैशे भेटल्यावर, आम्ही तुम्हाला ओळखत नाही' 🤷..
માતૃગયાहून ચોટીલા ला जायला Google Maps भला चांगला रस्ता (कमी वेळ, कमी kms) दाखवत असताना, एखादा खड्ड्यांचं ⛳ वरदान भेटलेल्या रस्त्याने नेणार.. म्हणजे, हे Google पेक्षा मोठे (sarcasm).. स्पष्ट सांगायचं झालं तर - वर म्हंटल्याप्रमाणे, डोकं .. .. (रिकाम्या जागा भरा)..
ढोकळा.. हिवाळ्यासारखा कोरडा आणि थंड.. तुम्हाला हे असलं combination कधी खायला भेटायला नको, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏.. सांगायचा तात्पर्य हा पण की, ह्यांच्या schedule मध्ये शेवटी हे जे म्हणतात (stylish font मध्ये), "आपला सर्वांचा प्रवास सुखाचा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना" - हे कधीच अशी प्रार्थना करत नसतात 🙅♂️.. 'दिखाने वाले दात, खाने वाले दात' 🐘 म्हणतात ना काहीतरी, तेच ते..
जेवण (in general) - आता प्रत्येक व्यंजन बद्दल किंवा बसायच्या अव्यवस्थे बद्दल काय लिहावं, म्हणून ह्या बाबतीत अजून काही नाही म्हंटलेलच बरं 🤫.. नवल ह्याचं पण वाटतं की, बाकीच्या वयस्कर लोकांचा ह्याला कुठेच आक्षेप नव्हता 😲.. वयासोबत आपण mature होऊन सगळ्याच बाबतीत हसत-खेळत compromise करायला शिकतो, ते म्हणजे हे..
रात्री (સોમનાથ) सांगणार की, 'आपण सकाळी (next day) 'जुने मंदिर' बघून 'भालका तीर्थ' 🏹 जाणार'.. सकाळी जेव्हा ह्याच्या प्रमाणे आम्ही 🛺 रिक्षात बसलो तर कळतं असं की 'भालका तीर्थ' आपण દ્વારકાला जातांना रस्त्यात करणार आहोत 😠.. तुम्हाला अजूनही मुद्दा नसेल लक्षात आला तर, ह्यांच्या प्रमाणे / ह्यांच्यासाठी ह्यांनीच दिलेल्या शब्दाला काही(च) किंमत नसते 😐..
वर तुम्ही ₹१६० बद्दल वाचलं, बरोबर?.. आता, સોમનાથला एक light 💡 and sound 🔊 show असतो, ज्याचं ticket आहे ₹४०, जे अजून आम्ही त्याला परत करायचे होते.. आणि બેટ દ્વારકાच्या 🛥️ boatची contri होती ₹१००.. total होतात ₹१४० - ok so far? 👍.. ह्याची त्याने round figure करून गोळा केले ₹१५०.. परवाच्या ₹१६० चे ₹१६० आणि आजच्या ₹१४० चे ₹१५० 👎.. गणित तर बघाच, सोबत नियत सुद्धा लक्षात घ्या..
bus प्रवास 🚍 - एकंदरीत आमच्या / माझ्या लक्षात आलं होतं की, दिवस भरात करावयाचा દ્વારકા ते વડોદરાचा प्रवास (५००+ कि.मी.) bus पेक्षा Indian Railways 🚇 ने केला तरच परवडेल, म्हणून બેટ દ્વારકાला दर्शन झाल्यावर माघारी येत जरी दुपार 🕛 झाली होती, "तत्काल" available / शिल्लक असल्याचा निसर्गाचा इशारा लक्षात घेतला.. ह्याचा, 'बाकीच्यांपेक्षा दोन तास उशिरा निघून तासभर लवकर पोहचणे', was the outcome 🤗.. in other words, ह्यांच्या प्रमाणे / ह्यांच्यासाठी ह्यांनीच दिलेल्या शब्दासोबत दुसऱ्यांच्या वेळेला ⏱️ सुद्धा किंमत नाही - round the trip, max speed of the bus I ever read was 63 kmph..
hotelहून દ્વારકાધીશ मंदिराला जातांना 'बँड बाजा' (बारात) 🎺 🥁.. अगदी लग्नातल्या मिरवणुकी एव्हढा नव्हता, पण तरी लोकांच्या नाचण्याचा 💃 🕺 उत्साह तितकाच.. that was "final nail 📌 in the coffin".. or, am I the only one to find it weird? 🫣..
schedule मध्ये गडबड अशी की आम्हाला सूर्यास्त 🌄 व्हायच्या आत કેવડીયાहून परत निघायचे होते.. म्हणजे, Statue of Unityचा laser show 🏮 बघायला आम्ही परत इतक्या लांब यायचं..
tour managerने मध्ये-मध्ये बरेच item दिले, म्हणून मी तरी त्याच्याशी "keep safe distance" ✋ policy follow करत होतो, नाहीतर हा लेख अजून मोठा व्हायला बघत होता..
७ दिवसाच्या एक छोट्याश्या tour मध्ये अशे अनुभव आलेत.. नशीब ह्यातच चांगलं म्हणावं की ह्यापुढे आपण काय केलं पाहिजे ✅ आणि भरपूर काही नाही केलं पाहिजे ❌, हे चांगलंच शिकलो आहे 🆗.. socialising was / is / will be just not my thing..
आता तुम्ही म्हणाल, सगळ्याच / कुठल्याच गोष्टींमध्ये perfection कधीच भेटत नसतं.. मान्य आहे 🤝, I am with you, no doubt.. पण ह्या गोष्टी काम करण्यासारख्या नाही, असं पण नाही 😏.. आणि, विचार करा, जर ह्या गोष्टी सुधारून हे travels वाले जर perfect झालेच तर, ह्यात नुकसान कोणाचंच नाही ना - it's a win-win situation 🤝..
अजून एक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असावा 🤔.. इतक्या negative गोष्टी झाल्या / ह्याला वाटल्या, तर काहीतरी positives पण झाल्या / वाटल्या असतीलच.. तर हो 👌, of course, definitely, शत-प्रतिशत 💯.. पण त्या positivesचा Yogesh Travelsशी तसा direct संबंध नाही.. म्हणून, ते इथे नमूद केलेले नाहीत.. तरी,
ज्यांना mythology 🔮 वर science ⚗️ पेक्षा जास्त विश्वास आहे, त्यांच्यासाठी गुरुजींनी દ્વારકા आणि इतर तीन धाम बद्दल छान माहिती दिली..
hotel roomsना 🏨 नावं ठेवायचं काही तसं खास कारण भेटलं नाही..
फक्त यांच्याबद्दल काय सांगायचं.. negatives इतर बाबतीतही होत्या.. articleचा विषय जरी नसला तरी, तुम्ही कधी विचार केला तर सावध ⚠️ राहा..
બેટ દ્વારકાच्या मंदिरात अजिबात शिस्त नसते.. गलती से सोचना भी मत.. (motion picture 'Pink' मधल्या famous dialog सारखं) 'no' means 'no'..
मी ह्या tourवर का गेलो? 🙍.. जर तुम्हाला यापुढे कोणी सांगितलं, "एक धाम मुलासोबत 👨👩👧👦 करा", तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईलच लक्षात.. आणि तेव्हा, I hope, ह्या articleची थोडीफार मदत होईल एक योग्य निर्णय घेण्यात 😊.. tourचं एक तेव्हढं चांगलं झालं की हेच वाक्य मला सुमेधला सांगायची वेळ नाही येणार 🥳..
बरं, तुम्ही इथपर्यंत आलाच आहात, तर हे पण सांगतो की इतर लोक (इतर travelsचे अनुभव असलेले) हे सुद्धा म्हणतात की, Yogesh Travels तरी बरे आहेत 👏.. शेवटच्या दिवशी तर काही लोकांनी भर-भरून जेवणाचे आणि hotelsचे कौतुक करून आभार प्रकट केले..
पण, आमच्यासाठी - ह्याचा एक अर्थ असाही होतो की, स्वतः planning करणे सर्वोत्तम.. शाळेत जे गांधीजींबद्दल शिकवलं / शिकलो, त्यातली एकच गोष्ट जी नेहमीच 'पत्थर की लकीर' सारखी लक्षात राहिली आहे, ती म्हणजे - ते म्हणायचे, "अपना काम स्वयं करो" 😇..








Comments
Post a Comment